स्व.मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन

    40

    ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चंद्रपूर(दि.31ऑगस्ट):-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व चंद्रपूर जिल्हा हॉकी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.

    स्व.मेजर ध्यानचंद यांनी खेळाला मिळवुन दिलेले नाव लौकिक, प्रसिध्दी व खेळाडू हा जिद्दीने, मेहनतीने स्वतःला घडवून देशाचा गुण गौरव कसा करु शकतो यांचे प्रख्यात उदाहरण म्हणून मेजर ध्यानचंद यांची ख्याती आहे. त्यांच्या अविस्मरणीय कार्याला सर्व जगभर आदराचे स्थान प्राप्त आहे. त्यांनी देशाला हॉकी या खेळात अनेक पदके प्राप्त करुन दिली आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी क्रीडा दिनाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने करण्यात येते.

    या कार्यक्रमाच्यावेळी माजी कुलगुरु गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली तथा चंद्रपूर जिल्हा हॉकी संघटना चंद्रपूरचे अध्यक्ष किर्तीकुमार दिक्षित, शिव छत्रपती पुरस्कारार्थी (हँडबॉल) कुंदन नायडु, शिव छत्रपती पुरस्कारार्थी (हॅण्डबॉल) राजेश नायडु, उपाध्यक्ष हॉकी संघटना रमेश सिंग ठाकुर, सचिव हॉकी संघटना समिर पठाण, जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुश्ताक, तालुका क्रीडा अधिकारी मुलचे ओमकांता रंगारी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रीडा अधिकारी आ.बी. वडते यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे, प्रविण देसाई यांनी सहकार्य केले.