प्रहार संघटनेच्या वतीने तलवडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उनवणे यांचा सत्कार

6

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.31ऑगस्ट):-कोरोनाच्या प्रतिकुल परिस्थिती मध्ये राञ आहोराञ जनतेच्या आरोग्य व सुरक्षेसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आपले कर्तव्य बजावत आसल्यामुळे तलवडा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ए पी आय उणवणे यांचा प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा नामदार बच्चु भाऊ कडु यांच्या आदेशाने व बीड जिल्हा कार्याध्यक्ष प्रा राजेंद्र अडागळे याच्या सुचनेवरून प्रहार अपंग संघटना तालुका अध्यक्ष नंदकुमार झाडे याच्या वतीने सिरसदेवी फाटा येथे शाल श्रीफळ देवुन भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी युवानेते दादाराव रोकडे, रामभाऊ अडागळे, आशोक अडागळे,बाळु अडागळे, सुरेशराव राठोड,आशोक कांबळे, सुनिल कांबळे रामेश्वर अडागळे, ओमकार अडागळे, महेश झाडे, लखन कासार ,राम उबाळे, मुक्तार शेख,भागवत गायके,पञकार सचिन वक्ते, शाम अडागळे, राजु खळगे आदिजन उपस्थित होते.