प्रशासनाची वेळेवर मदत न मिळाल्याने गावातील युवकांनी टीम बनवून केले गावकऱ्यांची मदत

30

🔹ब्रह्मपुरी तालुक्यातील पूरग्रस्तानची गाथा

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.३१ऑगस्ट):-ब्रम्हपुरी तालुक्यातील सोन्द्री या गावात आलेल्या भयानक पुरामुळे दयनीय अवस्था गावकरी लोकांची झाली होती. सोंदरी या गावात वेळेवर प्रशासनाची माणसं उपस्थित न झाल्यामुळे गावातील युवकांनी QRT whatsapp टीम तयार करून गावातील युवकांनी केली पूर पीडितांना मदत.

मौजा सोंद्री येथे पुराची भयावह स्थिती निर्माण होऊन सुद्धा प्रशासकीय मदत पोहोचली नाही. त्यावर उपाय म्हणून गावातील युवकांनी QRT प्रमाणे मदत टीम तयार करून अत्यंत जोखमीच्या स्थितीत सुद्धा तीन ते चार फुट पाण्यातून लोकांचे जीवनावश्यक वस्तू बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे पाण्याखाली आलेल्या जवळपास 20 ते 25 कुटुंबांना आवश्यक साहित्यासह सुखरूप बाहेर काढण्यात आले.

संपूर्ण गाव पाण्याखाली आल्याने गावचा संपूर्ण तुटला असूनही प्रशासनाने गावाकडे फिरून सुद्धा पाहिले नाही त्यामुळे गावामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील पाण्याची पातळी वाढत असून लोकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.