ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त गावांत आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची भेट

23

🔺निष्क्रिय शासनाबाबत लोकांचा केला आक्रोश शांत

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(31ऑगस्ट)- तालुक्यातील पूरग्रस्त गावांच्या दौऱ्यावर असतांना,अरेर नवरगाव,पिंपळगाव ,बेलगाव येथे आमदार बंटी भांगडीया यांनी भेट दिली.पुरामुळे या गावातील लोकांचे भरपूर नुकसान झाले असून याबत अजुन पर्यंत प्रशासनाने दखल घेतली नाही, त्यामुळे गावांतील लोकांचा तीव्र आक्रोश होता आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी भेट देताच तेथील नागरिकांचा आक्रोश शांत झाला.आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी गावांतील नागरिकांसाठी अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा करून सहकार्य केले.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

प्रत्यक्ष पाण्यात इंजिन बोटीद्वारे पूर परिस्थितीचे निरीक्षण करून आढावा घेतला. यावेळी वसंत वारजुकर ,दीपक उराडे, कृष्णा सहारे, योगेश राऊत,मनोज डवळे, रवी मेश्राम,आवेश पठाण, संतोष रडके ,सचिन आकुलवार आदी उपस्थित होते.