

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-७७५७०७३२६०
नांदेड(दि.31ऑगस्ट):- येथे न जाता नायगाव येथे बरा होऊन चालत घरी गेला आहे. लाईफ लाईन हॉस्पिटल नायगाव (खै.) येथे हृदयविकाराच्या तीव्र आजाराने त्रस्त होऊन आलेल्या रुग्णावर रिक्स घेऊन यशस्वीपणे उपचार डॉ. मधुसूदन दिग्रसकर व डॉ. केशव खादांखुळे यांनी केल्या नंतर अत्यवस्थ रुग्ण नांदेड येथे न जाता नायगाव (खै.) येथे बरा होऊन घरी चालत गेल्याची घटना घडली आहे.
यामुळे लाईफ लाईनचे डॉ.दिग्रसकर यांच्या नायगाव येथील शहरात नव्याने चालू केलेल्या सेवेमुळे दोन रुग्णाचे प्राण वाचून उपचारादरम्यान रुग्ण बरा झाल्याने नातेवाईक व जनसामान्यातून अभिनंदन करण्यात येत आहे. दि.१९/०८/२०२० रोजी रात्री ठीक ८ ते १० वाजताच्या दरम्यान रा. गुजरी ता. बिलोली जि. नांदेड येथील रुग्ण दिगंबर रूपाजी मुले वय ७० वर्षे पुरुष रुग्ण लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये छातीत दुखू लागले म्हणून. अत्यंत गंभीर अवस्थेत आला. येथील हृदय विकार तज्ञ डॉ. मधुसूदन दिग्रसकर (एमडी) डॉ. केशव खांदाखुळे यांनी तपासणी केली असता. ब्लड प्रेशर लागत नव्हते. आय तपासणी अशा सर्व तपासण्या करून हृदयविकाराचा तीव्र झटका आहे. असे निदान करून नातेवाईकांना सविस्तर माहिती दिली.
रुग्णाला नांदेडला जरी हलला तरी. कोणत्याही वेळेला दगावू शकतो. अशी परिस्थिती होती. नातेवाईकांना गांभीर्य समजल्यानंतर डॉ. दिग्रसकर साहेबांना विनंती करून सहकार्य करून इलाज करण्यासाठी विनंती केली. सर्व कायदेशीर व सोपस्कर करून साहेबांनी अतिशय मेहनत घेऊन रुग्णांना जीवनदान दिले. त्यानंतर आजच्या दिवशी पुरुष रुग्ण घरी चालत गेला आहे.
या पूर्वी मे महिन्यांमध्ये एका ५० वर्षीय महिलेच्या बाबतीत अशीच घटना घडली होती. या कामी लाईफ लाईन हॉस्पिटल ची सर्व टीम व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेऊन महिलेला व पुरुषाला जीवनदान दिले आहे. याकामी डॉ. दिग्रसकर यांचा सिंहाचा वाटा आहे. रुग्णाच्या नातेवाइकांनी प्रतिक्रिया दिली आहे. नायगाव तालुक्यातील कितीही रुग्ण असो नांदेड ला जाण्याची गरज पडणार नाही. अशी व्यवस्था लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये उपलब्ध झाली आहे. लाईफ लाईन मधील हे काम पाहून ज्यांनी लाईफ लाईन हॉस्पिटल सुरू करण्यास प्रोत्साहन दिले आहे. ते माजी आमदार वसंतराव चव्हाण साहेब, डॉ. असोशियन संघटनेचे नायगाव तालुका अध्यक्ष व सर्व डॉक्टर्स यांनी डॉ. दिग्रसकर व डॉक्टर खादाखुळे, लाईफ लाईन च्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन केले आहे.