तहसीलदार सुनिल सावंत यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार

17

🔸माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समिती वरुड तालुका तर्फे आयोजन

✒️वरुड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरुड(दि.31ऑगस्ट):-केंद्रीय निवडणुक आयोग मान्यता प्राप्त नॅशनल सोशलिस्ट पार्टी(NSP) U सलग्ण महिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वरुड तालुका तर्फे तहसिल कार्यालय वरुड,चे तहसीलदार सुनिल सावंत यांचा कोरोना योद्धा म्हनुन सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.गेल्या काही दिवसापासुन संपुर्ण जगात कोरोना नावाच्या वायरस ने थैमान घातले आहे. या वायरस मुळे फार मोठ्या प्रमाणात नुक्सान सुद्धा झाले आहे.त्याचप्रमाणे आर्थिक नुक्सान सुद्धा फार मोठ्या प्रमाणात झाले आहे.

या वायरस मुळे मा.पंतप्रधान आणि मा.मुख्यमंत्री यांनी संचार बंदी सुद्धा लागू केली आहे.या मुळे कित्येक लोकांचा बळी सुद्धा गेला आहे. यामुळे अनेक उपाययोजना सुद्धा करण्यात आल्या आणि सुरुच आहे.कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता मा.उपविभागीय अधिकारी मोर्शी यांच्या आदेशानुसार तहसीलदार वरुड यांच्या तर्फे गावबंदी,नाकाबंदी,सुरक्षीत आंतर,मास्क ची सक्ती यांसारख्या अनेक प्रकारच्या उपाययोजना लागू केल्या गेल्या आहे.आणि म्हनुन योग्य तो निर्णय घेऊन कोरोनावर मात करत असल्यामूळे केंद्रीय निवडणुक आयोग मान्यता प्राप्त नॅशनल सोशलिस्ट पार्टी(NSP) U सलग्ण महिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वरुड तालुका तर्फे तहसिल कार्यालय वरुड,चे तहसीलदार सुनिल सावंत यांचा कोरोना योद्धा म्हनुन सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी वरुड तालुका अध्यक्ष्य हेमंत कोंडे,तालुका संघटक धनंजय गायकी,तालुका संपर्क प्रमुख हर्शल बिजवे,उपाध्यक्ष सागर चोरकर,साचिव प्रणय लोखंडे,सहसचिव रोशन गावंड़े,योगेश बघेले,रोशन बरडे आदी पदाधिकारी उपस्थीत होते.