रावे उपक्रमा अंतर्गत खूर्सापार येथे वृक्षारोपण

    34

    ✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    चिमूर(दि.1सप्टेंबर):-सध्यास्थितीत कोरोनामुळे शैक्षणिक आस्थापने, शाळा, महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्क फ्रॉम होम पद्धतीने हळूहळू शैक्षणिक कार्य चालू आहे. याच पार्श्वभूमीवर मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी सौरभ कुबडे याने ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर तालुक्यातील खुर्सापार परिसरातील बांधवांना वृक्षलागवड विषयी माहिती दिली व वृक्षाचे फायदे याबद्दल थोङक्यात माहिती दिली व वृक्षांची घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन दिले.
    यावेळी सरपंच प्रशांत कोल्हे, ग्रामसेवक विजय आत्राम, सुमेध भरडे हे उपस्थित होते.

    या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषीदूतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. ए. ठाकरे व उपप्राचार्य ए. व्ही. कडू, सी. आर. ठोंभरे सर यांचे मार्गदर्शक लाभले.