भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते थेट गावात जाऊन ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्तांना करताहेत फूड पॅकेट्सचे वितरण

31

▪️माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कार्यकर्त्यांचे काम सुरूच

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.1सप्टेंबर):-गोसेखुर्द धरणासह इतर काही धरणाचे पाणी सोडल्याने ब्रम्हपुरी तालुक्यात वैनंगंगा नदीकाठच्या जवळपास २६ गावांमध्ये महापूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही लोक घराच्या छतावर जाऊन बसले आहेत तर काही झाडावर अडकलेले आहेत. घर पूर्ण पणे पाण्यात बुडल्याने अनेक लोक उपाशी आहेत. अशातच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते थेट पूरग्रस्तभागात जाऊन प्रशासन व NDRF टीम च्या सहकार्याने लोकांना फूड पॅकेट्सचे वितरण करीत आहेत.

चंद्रपुर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आम.सुधीरभाऊ मुगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व ब्रम्हपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा.अतुल देशकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या वतीने फूड पॅकेट्स तयार करण्यात आले. फूड पॅकेट्स तयार करून भाजपा कार्यकर्ते पूरग्रस्त भागात जाऊन लोकांना फूड पॅकेट्सचे वितरण करत आहेत.

या मदत कार्यात भाजपा जिल्हा महामंत्री व जि.प.सदस्य संजय गजपुरे, शहर महामंत्री तथा नगरसेवक मनोज वठे, शहर कोषाध्यक्ष अरविंद नंदूरकर, युवा मोर्चा अध्यक्ष प्रा. सुयोग बाळबुधे, महामंत्री रितेश दशमवार, महामंत्री स्वप्नील अलगदेवें, साकेत भानारकर, अरविंद कुंभारे, ओबीसी आघाडी अध्यक्ष पंकज माकोडे, सचिव दत्ता येरावार, तनय देशकर, नानाजी संगमावर, रेहमान खान पठाण, लोखंडेजी, नामदेव लांजेवार, अरुण भगत, अरुण बनकर, महिला आघाडीच्या अनघा दंडवते, मंजिरी राजणकर, रेखा राऊत, प्रतिभा धोटे, वृषाली करंबेळकर व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपाच्या या मदतकार्याने या परिसरातील अनेक वयस्कर नागरिकांनी १९९४ व २००५ ला आलेल्या पुराचे वेळीही भाजपानेच पुरग्रस्तांसाठी सर्वप्रथम भोजन व्यवस्था केल्याची आठवण देत सेवा देणाऱ्या भाजपा व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे.