वंचित च्या आंदोलना पुढे अखेर सरकार नमले—ज्ञानेश्वर कोठेकर

26

🔹आठ दिवसात सर्व धार्मिक स्थळे उघडली जाणार

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)
मो:-8080942185

केज(दि.1सप्टेंबर):-विश्व वारकरी सेनेने मंदिर उघण्यासाठी पुकारलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंबा मिळाला आणि एक लाख वारकरी मंदिर प्रवेश करणार अशी घोषणा समस्त बहुजनांचे नेते ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी केली होती.

आज देशासहीत राज्यातील सर्व मंदिरे प्रार्थना स्थळे हे बंद आहेत इतिहासात पहिल्यांदा विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे भक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आले लाखो वारकऱ्यांची श्रद्धा स्थान असलेली वारी या वर्षी वारकरी या वारीला मुकला होता गेल्या पाच महिण्यापासून मंदिरातील भजन किर्तन हे बंद आहे आज घडीला राज्यातील दारूची दुकाने चालू झाली आहेत दोन नंबर चे सर्व व्यवसाय जोरात चालू आहेत मंग आमच्या विठ्ठलाचे मंदिर बंद का असा प्रश्न विश्व वारकरी सेनेनं उपस्थित केला तेव्हां सरकारने कानडोळा केला पण जेव्हा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी या विश्व वारकरी सेनेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला त्यावेळी एक लाख वारकरी पंढरपूरात मंदिर प्रवेश करणार आहेत त्यावेळी हे आंदोलन महाराष्ट्रात चर्चेला आले आणि राज्यातील विविध वारकरी संप्रदायाने ह्या मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला सर्व वारकरी संप्रदायाच्या साधू संतांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकरांचे आभार मानले व आम्ही या आंदोलना मध्ये सहभागी होऊ असे सांगितले या आंदोलनाच्या वाढता पाठिंबा पाहता सरकारने मंदिर उघडण्याच्या निर्णय घेतला वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंबा मिळाला म्हणून या आंदोलनाला धार आली आणि मंदिर आंदोलन सर्व वारकऱ्यांच्या उपस्थिती मध्ये यशस्वी झाले आणि सरकारने सांगितले येत्या आठ दहा दिवसांमध्ये सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात येतील असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारकऱ्यांन्या सांगितले आहे.

महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातील सर्व वारकऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे आभार मानले आहेत असे वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हासंघटक ज्ञानेश्वर कोठेकर यांनी पञकातुन कळवले आहे.