बाळासाहेब आंबेडकरांवर टिका केलीच पाहिजे

16

राजकारणातील कोणाला काही समजत नाही ते कोणत्या ही नेत्यावर टिका करतात.. आणि बाळासाहेबांवर तर टिका केलीच पाहिजे..
बाळासाहेबांनी काही भुमिका घेतली तर त्यावर टिका केली तरच आपल्याकडे या प्रस्थापितांचे लक्ष जाईल.. तरच आपल्याकडे एखाद्या तालुक्यात पुरती ओळख असणारया अखिल भारतीय संघटनेचा संघटनेच्या अध्यक्षांचे लक्ष जाईल आणि तालुक्यात ओळख असणारया एखाद्या संघटनेचे राष्ट्रीय पद मिळेल..
काही जनांना त्याच्या नावाबरोबर एखाद पद पाहिजेच असते ,. पदाविना तो राहुच शकत नाही.,. अशी एक जमात आहे. ती जमात एखाद्या पक्षात पद मिळाले नाही कि लगेच दुसरया पक्षात जातात,.

सर्वात सर्वात महत्वाचे म्हणजे बाळासाहेबांवर टिका करणे खुपच सोप्पे आहे.
त्यासाठी काहीच लागत नाही .. अक्कल तर बिलकुलच लागत नाही.
फक्त मी आंबेडकरी चळवळीतला आहे,. हे सांगायच
मला बाबासाहेबांची चळवळ पुढे न्यायची आहे
मी बाबासाहेबांच्या विचारांचा आहे
हे सांगायाचे किंवा यापेक्षा अजुन काही तर किंवा कोठे तरी काय तरी कार्यक्रम घेतला ते दाखवायचे बस्स .. मग
त्यानंतर बाळासाहेबांवर टिका करणे एकदम सोप्पे …
मग या टिका करणारयांना
*फक्त जर दोन ते तीन प्रश्न* विचारले ना मग ते त्या प्रश्नाची कधीच उत्तरे देणार नाहीत., ते त्या प्रश्नापासुन पळवाट काढणारच .,
बाळासाहेबांवर टिका करणारयांना
बाळासाहेबांवर टिका करणारे कधीच सांगत नाही .
मागील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी कोणती राजकीय भुमिका घेतली होती.
टिका करणारयांना आधी सांगावे कि आपण कोणत्या पक्षाचे काम करता.? आपल्याला कोणता पक्ष आवडतो..?
आपण कोणत्या पक्षाचे सरकार आलेले आवडले असते ?
आणि अशाच व्यक्तीने टिका करावी आणि अशाच व्यक्तीच्या टिकेला उत्तर द्यावे ..

ज्या व्यक्तीला राजकीय भुमिका आहे.. ?
आणि त्याची राजकीय भुमिका सत्तेच्या जवळपास तरी असली पाहिजे…
नाहीतर काही जन एकीकरणाच्या नावाखाली नवीनच संघटना काढतात… त्याच संघटनेचे पदाधिकारी ही होतात..
एकीकरणाच्या नावाखाली बाळासाहेबांवर टिका करणे तर अजुन सोपेच असते,,

काहीजन संघटना किंवा राजकीय नेते ही
बाळासाहेब राजकारणात जोर धरायला लागल्यावर एकीकरणाचे स्वप्न पडत असते… मग समाज्याकरीता एकीकरण करण्यास तयार असतात,, पण त्याच्या बरोबरच प्रस्थापित पक्ष न सोडता एकीकरण करण्यास तयार असतात.,.
तर काहीजनांना स्वतःलाच तिकिट मिळते कि नाही तेच माहित नसते तरी पण या पक्षात या त्या पक्षात या अशा आँफर देत असतात.,

जर काहीजनांनी प्रस्थापित पुरोगामी पक्षाबरोबर युती करुन जेव्हा त्या प्रस्थापित पक्षांचे खरे रुप कळले तरी ते स्वाभिमानी समजणारे नेते त्याची साथ सोडायला तयार नाहीत..
काही भाषण करणारे आता नामांतरामध्ये ज्यांनी घरे जाळली त्याच्या बरोबर युती कारणारया पक्षाबरोबर काम करतात..
विधानपरिषदेचा तुकडा टाकतील या आशेवर बरीच त्यांच्या मालकांच्या दाराच्या बाहेर दिवस रात्र बसुन आहेत.,,
बाळासाहेबांनी काही राजकीय भुमिकि घेतली कि त्या सत्तेतल्या प्रस्थापित मालकांच्या दाराबाहेरुन जोरजोरांने भुंकायचे .. तो मालक प्रस्थापित मालक पण बघतो कोण जोरात आणि जास्त भुंकतो .. ईतक करुन ही घराबाहेर राहुन भुंकणारयाला सत्तेचा तुकडा तो मालक टाकत नाही..
तर काही जन काहीही न करता बाबासाहेबांच्या विचारांच्या एकदम विरोधी भुमिका घेणारया गटातच सहभागी झालेत कारण काय तर यांनी तुकडा टाकला नाही मग त्यांच्याकडे गेलो ,तर ते बोलतात मी तुकडा नाही तर थोडी थोडी का होईना शिळी भाकरच देतो पण ईकडेच राहायचे . तुझे ते सर्व विसरायचे आम्ही काय देईल त्यावर राहायचे त्या वर लढायचे ,.आमचाच पक्ष आमचेच चिन्ह ..
मग काय खुश काहीच न करता .,तुकडे मिळतात मग ईतके शिळे तुकडे मिळाल्यावर थोडे टाकायचे आणि ईतरांना सांगायचे … करा बाळासाहेबांवर टिका ..
असे तुकडे खाऊन टिका करणारी काही तयार झालेत..
पण हे सगळे मागील निवडणुकीच्या आधी कोणती राजकीय भुमिका असे विचारल्यावर गल्लीतले सुपर हिरो मात्र मतदान गुप्त अधिकार आहे हे सांगतात जनु काही त्यांनी सांगितल्यावर फाशीच देणार आहेत..
पण प्रस्थापित पक्षाच्या वळचणीला बहाणारे कधीच सांगणार नाहीत मागील निवडणुकीत कोणती भुमिका घेतली .असो किंवा त्याची राजकीय भुमिका काय ?

आसो बाळासाहेबांनी राजकीय भुमिका घेतल्यावर काही जन बाळासाहेबांना धार्मिक भुमिकेतुनच टिका करतात,
बाळासाहेबांवर राजकीय भुमिकेतुन टिका करा ते राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. आणि त्यांनी घेतलेली भुमिका ही राजकीय स्वरुपाची जर असेल तर बाळासाहेबावर राजकीय भुमिकेतुन टिका केली पाहिजे ..

मग बाळासाहेबांचे डफली वाजवुन आंदोलनाचे असो किंंवा पंढरपुरच्या मंदिरासाठीचे आंदोलन आसो .
त्यानी राजकीय भुमिकेतुन टिका करा ,
काही जन बाळासाहेबांना फक्त बौध्द हेच लेबल लावून टिका करतात. तर राजकीय नेता जेव्हा आसतो तेव्हा तो सर्व जाती धर्माचा राजकीय नेता असतो..
काही जर लोकसभेला 45 लाख मतदान घेतले असेल तर निश्चितपणे ईतर सर्वच जाती धर्मातील लोकांनी बाळासाहेबांच्या राजकीय पक्षाला मातदान केले आहे.. आणि मग मतदान करणारे जर ईतर जाती धर्मातील आसतील तर त्या जातीधर्मातील मतदारांच्या अडीअडचणीनुसार राजकीय नेता म्हणुन जर राजकीय स्वरुपातील बाळासाहेबांनी आंदोलन केले असेल तर इतरांना टिका करण्याचा आधिकारच नाही.,
आणि त्यांच्या आंदोलनामुळे सत्तेतील जागे झालेत ..
नाहीतर सत्तेतील नेत्यांनी कोरोनाची भिती दाखवुन सर्वसामान्यांच्या नोकरया तर गेल्यातच ..त्यात बेरोजगारीचे प्रमाण तर शिंगेला पोहचले त्यात सत्ताधारयांनी शासनाच्या हक्काच्या बरयाच कंपन्या खाजगी भांडवलदारांना विकल्यात . अब्जावधी रुपयाचे कर्ज मोठमोठ्या उद्योगपतीने बुडवले आहे.
पण सर्वसामान्यासाठी मात्र काही देण्याची वेळ आल्यावर सरकारकडे पैसे नसतात…
असो

बाळासाहेबांनी घेतलेल्या राजकीय भुमिकेमुळेच केलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहेच…

✒️लेखक:-यश भालेराव
              मो:-9067047333

▪️संकलन:-नवनाथ पौळ
केज तालुका प्रतिनिधी
मो:-808942185