श्री. दत्ता सांगळे यांच्या नवनियुक्तीबद्दल अभिनंदन.!

  43

  ✒️माधव शिंदे(नांदेड,विशेष प्रतिनिधी)मो:-7757073260

  नांदेड(दि.1सप्टेंबर):-डोंबिवली, जि. ठाणे येथील डोंबिवली शहर शिवसेनेचे माजी विभागप्रमुख, “दिव्यांग परिवार”.! चे संस्थापक श्री. दत्ता सांगळे यांची “दिव्यांग विकास फाऊंडेशन”चे व्यवस्थापकीय संचालक श्री. बापूराव काणे यांनी नुकतीच “महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख”पदी नियुक्ती केली आहे.

  “दिव्यांगप्रश्नी राज्य स्तरावर श्री. दत्ता सांगळे यांचे कार्य पहाता फाऊंडेशनच्या कामात ते भरीव योगदान देतील”, असे यावेळी श्री. बापूराव काणे म्हणाले.

  दिव्यांग विकास फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यातील दिव्यांगांना त्यांचे “न्यायहक्क” मिळवून देण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करताना श्री. दत्ता सांगळे म्हणाले की फाऊंडेशनच्या राज्यभरातील पदनियुक्तींचे काम सध्या सुरु असून निरपेक्ष भावनेने याकामी योगदान देणार्यांचे तसेच दिव्यांगांच्या सुचना, संकल्पनांचे स्वागतच आहे.

  श्री. दत्ता सांगळे यांना त्यांच्या नवनियुक्तीबद्दल राज्यातील विविध संस्था, संघटना, पदाधीकारी यांनी त्यांच्या भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

  श्री. दत्ता सांगळे, संपर्क : ८१६९०८५७६६