वन मॅन आर्मी….!!

16

अनेकदा हे सिद्ध झाले आहे की, बाळासाहेब आंबेडकर हे जनमाणसाच्या मनात आदराचे स्थान मिळवून आहेत…!!
कितीही अडचणीची परिस्थिती असु द्या,लाखो लोक बाळासाहेब आंबेडकरांच्या हाकेला धावून येतात…!!
कितीही विपरीत परिस्थिती असु द्या जनता अडचणींवर मात करीत बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबतं खांद्याला खांदा लावून आंदोलन यशस्वी करते…!!
जो नेता जनभावनांची कदर करतो आणि त्यासाठी आपलं कौशल्य तथा राजकारण पणाला लावतो,त्याच नेत्यांसाठी जनताही धावून येते हा अनुभव आता नवा नाही…!!
लोकशाही मुल्यांच जतन झालं पाहिजे म्हणून अॅड बाळासाहेब आंबेडकर हे मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन पुढे आलेत, बाळासाहेब आंबेडकर म्हणतात लोकशाहीत सामान्य माणूस राजा आहे,शासन राजा नाही, शासनाने सर्वसामान्य माणसाच्या भावभावनांची कोंडी करणे हे लोकशाही विरोधी आहे, हुकुमशाहीचे लक्षण आहे.म्हणून भाविकांना भजन कीर्तन करण्या पासून वंचित ठेवणा-या शासनाने विचार केला पाहिजे…!!
आज शासनाने शक्य तेवढे प्रयत्न करुन पंढरपूर मंदिर प्रवेशाचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला…!!
सोलापूर जिल्ह्यात आणि पंढरपूर येथील एस.टी.बसेस बंद करून येणारांची नाकेबंदी केली, प्रशासनाने तगळा पोलिस बंदोबस्त लाऊन आणि कमांडो तैनात करुन भयग्रस्त जनतेच्या मनात अधिकच भयाची भर पडली पाहिजे हाही प्रयोग केला…!!
बाहेर गावाहून येणाऱ्या कित्येक कार्यकर्त्यांना अडवून रोखण्यात आले, भयाची निर्मीती करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मिडियाचा वापर केला आणि सातत्याने भीती दाखविण्याचाही प्रयोग कालपासून सुरुच होता…!!
पुरोगामी, पुरोगामी म्हणून मिरविणारे नेते कायद्याचं नांव घेऊन पाठीत खंजीर खुपसायला पुढे आले आणि त्यांनीही अकलेचे तारे तोडले…!!
टाळेबंदी लागु असतांना, अनेक अडथळे निर्माण केलेले असतांनाही आज पंढरपूर मंदिर आंदोलनाला अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला आणि आंदोलन यशस्वी झाले…!!
कुठलाही अडथळा आंदोलनाचा फज्जा ऊडवू शकला नाही ही जनमाणसांची ताकद आहे…!!
या अगोदर सुद्धा आंबेडकर भवन फडणवीस सरकारने ध्वस्त केले होते तेव्हा अतिशय विपरीत परिस्थिती होती, संततधार पाऊस सुरू होता तरीही लाखो लोक बाळासाहेब आंबेडकरांच्या हाकेला प्रतिसाद देऊन मुंबईत दाखल झाले होते…!!
२०१८ मध्ये भिमा कोरेगाव प्रकरणात कुठलीच तयारी नसतांना बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंद ची हाक दिली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने अभुतपुर्व महाराष्ट्र बंद यशस्वी केला होता…!!
म्हणून आजच्या काळातील वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते हे वन मॅन आर्मी आहेत…!!
त्यांच्या निर्णयाला छेद देण्याचा कुणीही प्रयत्न करु द्या,जनता त्यांच्या सोबतं आहे हेच सिद्ध होतं आहे…!!
आता नवं समीकरण तयार झाले आहे,ज्या समुहाला आपल्या मागण्या पदरात पाडून घ्यायच्या आहेत,ज्यांना लोकशाही प्रक्रियेत न्यायाची अपेक्षा आहे त्या सर्वांनाच बाळासाहेब आंबेडकर हे तारणहार म्हणून दिसू लागले आहेत…!!
घराणेशाही आणि कुटुंब कबील्याच्या राजकारणात अडकलेले बहूतेक नेते आता जनतेसाठी रस्त्यावर येतं नाहीत हे वास्तव जनतेच्या लक्षात आले असावे…!!
🙏जयभीम

✒️लेखक:-प्रा.भास्कर भोजने सर
( राजकीय विश्लेषक पुरोगामी चळवळीचे भाष्यकार, विचारवंत, जेष्ठ मार्गदर्शक) अकोला जिल्हा
मो-99602 41375

▪️संकलन:-नवनाथ पौळ
केज तालुका प्रतिनिधी
मो:-8080942185