बिन पावसाचा पुरामुळे अनेक घर जमीनदोस्त – लोक झाले घरापासून पोरके

    48

    ✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

    ब्रम्हपुरी(१ सप्टेंबर):- वैनगंगा नदीला आलेल्या पुराणे माजवला हाहाकार पंचवीस वर्षानंतर आलेल्या भयानक पुरामुळे दयनीय अवस्था झाली होती.वैनगंगा नदीच्या पात्रात असलेल्या सर्व गावांना जोरदार फटका बसला.
    अर्हेरनवरगाव, पिंपळगाव(भोसले), सोंद्रि, भालेश्र्वर, बेळगाव – कोल्हारि, आणि इतर नदी पात्राजवळ वसलेले गावातील पुराच्या भयानक पुराणे लोकांचे घर जमीनदोस्त झाले आहेत. आता घरापासून पोरके झालेल्या लोकांना शासनाच्या मदतीची गरज आहे. तरी शासनाने लवकरात लवकर नदीकाठच्या गावांना भेटी देऊन आर्थिक मदत करावी व त्यांच्या अन्नधान्याची सोय करून द्यावी एवढीच गावकरी लोकांची मागणी केली आहे. ती गरज लक्षात घेता शासनाने तातडीने पूर्ण करावी.