राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने आॕनलाईन राष्ट्रसंत क्रांतीपर्व स्मृती दिन

8

🔸राष्ट्रसंताची राष्ट्रभक्ती देशवासियांसाठी प्रेरणादायी – सर्वाधिकारी प्रकाश वाघ

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.1सप्टेंबर):-राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी १९४२ च्या आॕगस्ट क्रांतीलढ्यात उडी घेऊन गावखेड्यात राहणाऱ्या जनतेला ब्रिटिश सत्तेविरूध्द उभे केले. त्यांच्या क्रांतीकारी खंजेरी गीतांनी प्रभावित होऊन अनेक लोक देशांसाठी शहिद झाले. देशभक्ती हीच खरी देवभक्ती आहे , हा विचार दिला. जनतेला कर्मकांड , अनिष्ट रूढ्यापासून दूर ठेवत त्यांच्यात राष्ट्रवाद रूजविला. एकदंरीत स्वातंत्र्य आंदोलतील त्यांचे योगदान ऐतिहासिक होते , असे प्रतिपादन अ.भा.श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांनी केले.

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती च्या वतीने आपल्या ग्रुपवर व्हॕटसॲप ग्रूप व फेसबुक पेजच्या माध्यमातून राष्ट्रसंत आॕगस्ट क्रांतीपर्व सप्ताहात ते बोलत होते . सदर सप्ताह नुकताच आॕनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे संकल्पनेतून आयोजित ह्या क्रांतीपर्व सप्ताहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विरचित क्रांतीभजन व देशभक्तीपर गीतांचे घरगुती वैयक्तिक गायन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याध्ये एकूण ५८ मान्यवरांनी सहभाग दर्शवून गायनांचे व्हीडीओ ग्रूपवर पोस्ट केले. तसेच बाल-गोपालांसाठी भारतीय क्रांतीकारक चित्र रेखाटन स्पर्धा घेण्यात आली होती . या मध्ये एकूण ३१ बालकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. त्यांनी क्रांतीकारकाचे स्वहस्ते चित्र काढून ग्रूपवर पोस्ट केले.

आॕगस्ट क्रांतीआंदोलनाचे विदर्भातील प्रणेते म्हणून दि. २८ आॅगस्ट १९४२ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना चंद्रपूर शहरातील भिवापूर येथे इंग्रजांनी अटक केली. त्या घटनेचे स्मरण म्हणून एका दिवशी विविध मान्यवरांचे मार्गदर्शन ठेवण्यात आले. त्यात प्रामुख्याने अ.भा. श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ , उपसर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे , धम्ममित्र नामदेव गेडकर नागपूर, चिमूर चे राजेंद्र मोहितकर , राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.बाळ पदवाड नागपूर, मुंबई चे ज्येष्ठ पत्रकार जयवंत बामणे , ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , तेलंगना स्टेट चे प्रचारक संजय तिळसमृतकर , गडचिरोली चे जिल्हा सेवाधिकारी डॉ. शिवनाथजी कुंभारे इत्यादींनी आॕनलाईन पध्दतीने अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले तसेच समारोपीय कीर्तन वणी येथील सप्तखंजेरीवादक उदयपाल वणीकर यांनी प्रबोधन करून स्वयंस्फुर्तीने सहकार्य केले.

प्रास्तविक ॲड. राजेंद्र जेनेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन विलासराव उगे यांनी मानले. ग्राफिक्सकार रामकृष्ण चनकापुरे , संजय वैद्य , मोहनदास चोरे आदी मान्यवरांचे ह्या अभियानास सहकार्य मिळाले. ग्रुपमधील सर्व मान्यवर मंडळींना आयोजन आॕनलाईन सन्मानपत्र समितीच्या वतीने प्रदान करण्यात आले.