शासकीय रूग्णालयातील पत्नीच्या डिलेवरीनंतर आता शासकीय रुग्णालयातच घेत आहेत नांदेडचे जिल्हाधिकारी कोरोनावर उपचार

  43

  ?जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह राज्यातील सर्व नेते, अभिनेते यांच्या समोर एक आदर्श

  ?जिल्हाधिकारी यांनी कोरोना आजारातून बरे होऊन दिव्यांगांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढावे अशी शेकडो दिव्यांगांनी केली प्रार्थना

  ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

  नांदेड(दि.2सप्टेंबर):-जिल्ह्यात कोरोना या महामारीने धुमाकूळ घातला आहे.दररोज शे – दोनशे रूग्ण हे बाधीत आढळतच आहेत.अशातच काहि दिवसाआधी नांदेडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डाॅ.विपीन ईटणकर यांनी त्यांच्या सौभाग्यवती यांना प्रसुतीकरीता पुढिल उपचारासाठी शासकिय रूग्णालयात दाखल केले असता त्यांना एक गोंडस कन्यारत्न प्राप्त झाले आहे.आणि अशातच जिल्हाधिकारी यांना दोन दिवसांपासून तब्बेतीची शंका येत होती म्हणून त्यांनी आपली तपासणी केली असता ती पाॅझिटिव्ह आढळली आहे आणि पुढिल ऊपचारासाठी ते शासकिय रूग्णालयात दाखल झाले आहेत. हा त्यांचा आदर्श इतर सर्वांनपुढे प्रेरणादायी ठरेल असे राहुल साळवे यांनी म्हटले आहे ,तसेच साळवे पुढे म्हणाले की याआधी नांदेड जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी हे कोरोना पाॅझिटिव्ह आढळले होते परंतु पुढिल उपचारासाठी मोठ मोठ्या शहरात जाऊन प्रसिद्धीत महागड्या रूग्णालयात ऊपचार घेऊन बरे होऊन परत आले असतांनाच जिल्हाधिकारी डाॅ.विपीन ईटणकर यांनी नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतीनीधीसह राज्यातील सर्व नेते – अभिनेते यांच्या समोर एक आदर्श उपक्रम राबवला असल्याचे म्हटले आहे.

  अशा या धाडसी अधिकार्यांकडुन जिल्ह्याभरातील शेकडो दिव्यांगांचे जे लाॅकडाऊन काळात विविध संकटांना सामोरे जात आपल्या प्रलंबित असलेल्या समस्यांना लोकशाहि मार्गाने विविध निवेदणे देऊन आंदोलन,उपोषणे करून.विविध मोर्चे काढत न्याय मिळवून घेण्याचा प्रयत्न करत असलेल्या शेकडो दिव्यांगांना ते नक्किच न्याय मिळवून देतील, यासाठी दिव्यांगांकडून प्रार्थना हि केली जात असल्याचे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल सिताराम साळवे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.