
✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405
परळी(दि.2सप्टेंबर ):-स्वाभिमानी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य चे वतीने परळी तहसीलदार यांना विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन सादर केले.या निवेदनात खाजगी ईपास रद्द करन्यात यावे,शेतकरी यांचेशी उद्धट पद्धतीने वागणारे आणि पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँक मॅनेजर यांचेवर कारवाई करण्यात यावी, शेतकऱ्यांची दिशाभूल न करता सन्मानाने वागणूक देऊन कर्ज वाटप करावे.
तसेच पिका वरती कर्पा पडल्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी स्वाभिमानी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ सांगळे यांच्या नेतृतत्वाखाली स्वाभिमानी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष विजय बडे , परळी तालुका अध्यक्ष गणेश मुंडे.,देवा उपाड,मनोज कांदे, सूरज चाटे, लखन कांदे,विश्वजित विडेकर, यांनी नायब तहसिलदार रुपनर साहेब यांच्याकडे निवेदन देताना केली.