✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587

सेनगाव(दि.2सप्टेंबर):-कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील औंढा नागनाथ येथील वीरशैव लिंगायत धर्माचे आद्यगुरू राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोषराव बांगर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी औंढा नागनाथ येथील पाची पांडव जैन मंदिराची देखील आमदार संतोषराव बांगर यांनी पाहणी केली तसेच औंढा नागनाथ येथील ज्येष्ठ व्यापारी दीपक अग्रवाल यांच्या कुटुंबीयांची देखील सांत्वनपर भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी सोबत जी.डी.मुळे, हिंगोली चे नगरसेवक रामभाऊ कदम, तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, नगराध्यक्ष राम मुळे, श्रीराम राठी, अनिल देशमुख, माजी नगराध्यक्ष बंडू चोंडेकर, शहर प्रमुख अनिल देव, राहुल दंतवार, लक्ष्मण पवार, राजू चोंडेकर, मनोहर चोंडेकर, सुनील खंडागळे, माधव गोरे, मनोज देशमुख, लल्ला देव, विष्णू जाधव, बालाजी घुगे, प्रकाश घुगे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

अहमदनगर, महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED