गेवराई तहसीलवर गोरगरीब जनतेला वेठीस धरले तर गाठ माझ्याशी – सुनिल ठोसर पाटील

6

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.2सप्टेंबर):-गोरगरीब शेतकरी बांधवांना काही कामानिमित्त आले तर खूप अडचणी दाखवून दिशाभूल करून मागे पाठवून देतात. आणि ते काम पुढे ढकलून देतात. जे शेतकर्यांचे कामे असतील ते वेळोवेळी झाले पाहिजे.. आज रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अॅड रविप्रकाशजी ऊर्फ बापूसाहेब देशमुख साहेब यांच्या आदेशानुसार शेतकरी, दिव्यांग, श्रावण बाळ यांच्या प्रलंबित असलेल्या सर्व योजना व प्रश्न संदर्भात तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले.

दिव्यांगांना व वयोवृद्ध यांना वरती जाणे येणे कठीण होत असल्याने, त्यांचा मानधन प्रलंबित असून ते तात्काळ वर्ग करण्यात यावे. शेकडो दिव्यांग, शेतकरी, हे आमचे रयत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांच्याकडे संवाद साधत असल्याने दिसत आहे.. एखादा सामान्य माणूस मरत असल्यास आम्ही नेता पुढारी मारायला मागे वळून बघणार नाही.. बीड जिल्ह्यातील एखादा गोरगरीब माणूस हलगर्जी पणामुळे मरतात अश्या जबाबदार अधिकारी नेत्याला मारल्याशिवाय मी थांबणार नाही असे सुनील ठोसर यांनी आमचे प्रतिनिधी यांचेशी बोलताना सांगितले.

आमचा लढा सर्व माणसासाठी आहे.. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत कायम त्यांच्या दुखा:च्या काळात न्याय मिळवून देऊ.. या आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही ढोल वाजवत गाजवत आंदोलन करू असा इशारा जिल्हा प्रमुख सुनिल ठोसर यांनी दिला आहे..