🔹आतापर्यतची बाधित संख्या ९६ 🔸जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित ४२ ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चंद्रपूर(दि:-30जून)जिल्ह्यामध्ये ३० जून रोजी आणखी एक बाधित आढळून आला आहे. जिल्ह्यातील राजुरा शहरातील जवाहर नगर येथील वीस वर्षीय युवक औरंगाबाद येथून आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात होता. २९ जून रोजी या युवकाचा स्वॅब घेण्यात आला. ३० जून रोजी नमुना पॉझिटिव्ह आला.