✒️गोंदिया (पुरोगामी संदेश नेटवर्क)

गोंदिया(दि.13सप्टेंबर):-ग्लोबल बंजारा अस्तित्व फौंडेशन चाळीसगाव, जळगाव ही संस्था दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्यातील गुणवंत,उपक्रम शिल शिक्षकांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आले.उपक्रमशील आणि गुणवंत, शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षकांचा दरवर्षी शिक्षकदिनानिमित्त या फौंडेशन तर्फे सत्कार करण्यात येतो. श्री राजेन्द्र धर्मदास बन्सोड सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा पंचायत समिती गोरेगाव, जिल्हा परिषद गोंदिया येथे कार्यरत आहेत.

यावर्षी त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील अतुल्य योगदानामुळे राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राजेन्द्र बन्सोड हे एक उपक्रमशील शिक्षक असुन जिल्ह्यात इंग्रजी विषयासंदर्भात होणाऱ्या अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पात सुलभक म्हणून काम करतात.
,स्पोकन इंग्लिश प्रोग्रॅम ब्रिटिश कौन्सिल तर्फ राबविण्यात आलेले इलिप्स प्रोग्राम,टॅग कोरडीनेटर,तसेच पुनर्चित अभ्यासक्रम इंग्रजी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. विविध प्रकारच्या लेख,कवितालेखन करतात.
विद्यार्थ्यांमध्ये सृजनशिलता विकासासाठी विविध कार्यशाळा आयोजित करून त्यांच्या कलागुणांना संधी देण्याचे काम करीत असतात. नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, शालेय व सहशालेय कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असतात.

कोरोना संक्रमण काळामुळे यावर्षी ऑनलॉइन पुरस्काराचे वितरण करण्यात आले सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि ट्रॅफि देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या सन्मानामुळे निंबा ग्रामवासी,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.माधव शिवणकर,शाळेचे मुख्याध्यापक श्री आर.एच.नंदेश्वर सर तसेच मातापालक समितीचे अध्यक्ष श्रीमती तेजेश्वरी ठाकरे,शिक्षकपालक संघाचे उपाध्यक्ष संजय शहारे ,राजेंद्र बहेकार उपाध्यक्ष शा..व्य.समिती ,केंद्रप्रमुख आर.आर.अगडे सर ,कोहरे सर, साखरे सर आणि विजय कोचे प्रेरक यांनी अभिनंदन केले .या सन्मानामुळे आप्तगण आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED