महाराष्ट्र तेलंगाना सीमेवरील ती 14 गावे महाराष्ट्राचीच असुन महाराष्ट्रातच राहणार – आमदार सुभाष धोटे

31

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(जिवती,विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

जिवती(दि.16सप्टेंबर):-तालुक्यातील महाराष्ट्र तेलंगना सिमेवरील मौजे परमडोली, मुकदमगुडा, लेंडीजाडा, शंकरलोधी, अंतापुर, येसापुर, भोलापठार, तांडा, कोटा , महाराजगुडा, पदमावती, इंदिरानगर, पळसगुडा, व लेंडीपुरा या 14 गावांचा प्रश्न गेली अनेक वर्षापासुन प्रलंबित आहे. महाराष्ट्राच्या हद्दीतील 14 गावांबाबत तेलंगना वन विभागाकडून त्या १४ गावातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे.

याबाबत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांची राज्याचे महसूल मंत्री मा. बाबासाहेब थोरात व महसुल विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांना तेलंगना वन विभागाकडून होत असलेली १४ गावातील मोजणी तातडीने थांबविण्याबाबतचे निवेदन दिले.
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे दालनात बैठक आयोजीत करून त्या १४ गावांबाबत असलेली समस्या अवगत करून दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा व कोरपना या तालुक्याची पुनर्रचना करून जिवती तालुक्याची निर्मिती करण्यात आली त्यावेळेस या १४ गावांचे नावे महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात उल्लेख आहे. याचाच अर्थ सदर गावे हि चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील असून महाराष्ट्राचीच आहे हि बाब वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली. सन १९६९ मध्ये वन परिक्षेत्र वनसडी यांनी या १४ हि गावांना चराई करीता जागा दिलेली होती.

हि गावे महाराष्ट्राच्या हद्दीत असुन वन विभागाने कोणत्याही परिस्थितीत आपला ताबा सोडू नये असे निर्देश मध्य चांदा वनविभाग चंद्रपूरचे उपवनसंरक्षक यांना दिले. या प्रसंगी बैठकीला राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष धोटे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वनविभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंडे, उपविभागीय अधिकारी जे. पि. लोंढे, उपविभागीय वनअधिकारी प्रितमशिंग कोडापे, जिवती वनपरिक्षेत्र अधिकारी कुमारी योगिता मडावी, जिवती तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गणपत आडे, प्रा. सुग्रीव गोतावडे, मुकदमगुडयाचे सामाजिक कार्यकर्ता रामदास रणवीर, आदी उपस्थितीत होते.