✒️ देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8432409595

गेवराई(दि.17सप्टेंबर):- तालुक्यातील राजमाता चौक रोहितळ येथे गुरुमाऊली मृदंग संगीत क्लास चे उदघाटन झाले यावेळी प्रमुख उपस्थिती गु,मृ,विशारद विष्णुपंत महाराज लोंढे गुरुजी व परिसरातील सर्व मित्र परिवार उपस्थित होते.

मृदंग विशारद सुग्रीव महाराज तावरे हे एका गरीब कुटुंबातील असून आजच्या या भरकटलेल्या समाजाला अज्ञान रुपी अंधारातून मुक्त करण्यासाठी सुग्रीव महाराजांनी रोहितळ येथे राजमाता चौक येथे विध्यार्थ्याचं भवितव्य घडवण्यासाठी गुरुमाऊली मृदंग संगीत क्लास सुरु केले.

जे जे आपणाशी ठावे “
“ते ते इतरांशी शिकवावे”
“शहाणे करुनि सोडावे “
“सकळजन”

या उक्ती प्रमाणे आपल्या जवळचे ज्ञान दुसर्यांना वाटले पाहिजे या विचाराने सुग्रीव महाराजांनी आपल्या सेवेत क्लास चे ओपनिंग केलं आहे तरी सर्व भाविकांनी आपल्या मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी आजच आपली नोंद करा व आपलं जीवन जीवन सुखमय बनवा.

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED