माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

24

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.18सप्टेंबर):-माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्राम पंचायतीमध्ये राबविण्यात येत असून जिल्ह्यातील प्रत्येक नागरीकांची आरोग्य पथकाद्वारे तपासणी केली जाईल. या मोहिमेस सर्व नागरीकांनी सहकार्य करावे आणि मोहिमे दरम्यान तपासणीसाठी घरी येणाऱ्या आरोग्य पथकांकडून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागा मार्फत केले आहे.

शासनाने राज्यभर माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील शहर, गावे, वस्त्या यातील प्रत्येक नागरीकाची आरोग्य तपासणी आणि प्रत्येक नागरिकास आरोग्य शिक्षण द्यावयाचे आहे. हि मोहिम दिनांक 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. मोहिमेची पहिली फेरी दिनांक 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर या कालावधीत होईल आणि दुसरी फेरी दिनांक 11 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोंबर या कालावधीत होईल आणि मोहिमेची सांगता दिनांक 25 ऑक्टोंबर रोजी होईल.