मुख्यमंत्री साहेब आम्हाला घरात राहू देता की, उघड्यावर राहण्याची शिक्षा देता

26

🔹अनेक घरकुलचे अडकले देयके, नागभीड पंचायत समितीचा भोंगड कारभार

✒️नागभीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागभीड(दि.19सप्टेंबर):-आम्हाला घर दीले परंतु घरात राहू देती की उघळ्यावर राहान्याची ही शीक्षा आहे. असा सवाल वीचारत रमाई घरकुल धारक उद्या रस्त्यावर आल्याशीवाय राहानार नाही. नागभीड पंचायत समिती अंतर्गत शासनाने रमाई घरकुल आवास योजना, शबरी घरकुल आवास योजना, पंतप्रधान आवास योजना अशा योजने अंतर्गत आम जनतेला घरकुल दीले. घरकुल देतांना त्यांच्याकडून एक वर्षात घर बांधून देन्याचा शपथपत्र ही पंचायत समीतीने मागवले. मात्र रमाईच्या लाभार्थ्यांवर सरकार अन्यायच करतो की काय असा आरोप आझाद युवा संघटनेने केला आहे.

करारानुसार घरकुल बाधन्यासाठी लाभार्थ्यांनी राहाते घर पाडून त्या ठीकानी घरकुलचं काम सुरु केलं. कोरोनाच्या महागाईत बांधकाम साहित्य मिळेनासे झाले आहे. व्यापाऱ्याची मनमानी सहन करुन, बांधकाम साहित्य वीकत घेतला. रोजगारांना त्यांच्या मनानुसार रोजी ठरवुन घर बांधकाम चालु केले. परंतु त्या गरीब लाभार्थ्याला त्याचा घरकुलचा पैसाच मीळेना. मग तो काय करनार.

घर कामाला लागनारे साहित्य उधारीवर आनला. म्हनुन व्यापारी तो घरी येवुन शीवीगाळ करतोय. रोजंदार रोजच फेऱ्या मारतात. अशा परीस्थीतीत लाभार्थी हप्त्याच्या हप्त्यात पंचायत समीतीच्या फेऱ्या मारतोय. त्याच्याकडे होता न्हवता पैसा त्याने शेतीत लावला. तर काही घराला लावला. आता बाकी काम कशाच्या बळावर करावा हा प्रश्न त्याला पडलेला आहे. अशा परीस्थीतीत सरकार त्याच्या आत्महत्तेची वाट पाहातो की काय? असा प्रश्न विचारत आझाद युवा संघटनेने सरकारला त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात आठ दीवसात टाकावेत अन्यथा रमाई घरकुल धारकांना घेवुन रस्त्यावर येवु असा ईशारा आझाद युवा संघटनेने निवेदनातून दीला आहे.