ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण राजे यांना अभिजित राणे युथ फांऊडेशन मुंबईचा राज्यस्तरीय विशेष पुरस्कार जाहीर

30

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.21सप्टेंबर):-महाराष्ट्रातील विख्यात ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण राजे स्तंभलेखक, कवी, सिनेमा नाटक मालिका समीक्षक आहेत. महाराष्ट्र राज्यातील विविध दैनिकात , साप्ताहिक आणि पाक्षिकात त्यांच्या बातम्या लेख कविता प्रसिद्ध होत असतात. तसेच विविध दिवाळी अंकात त्यांनी लिखाण केले आहे. विशेषतः वाद्यवृंद संगीत क्षेत्रातील निर्माता , दिग्दर्शक, गायक , निवेदक आणि आयोजक अशी त्यांची ओळख आहे. सुरज क्रिऐशन या बॅनरखाली त्यांनी स्वतंत्रपणे अनेक संगीत मैफली मुंबई पुणे येथे सादर केल्या आहेत.तसेच फेसबुक यूट्यूब चॅनल वर त्यांच्या गायन संगीत मैफल आणि गीतकार म्हणून लिहिलेल्या हिंदी गीतांचे अनेक व्हिडिओनां मोठ्या प्रमाणात लाईक मिळाल्याने ते लोकप्रिय झाले आहेत.ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण राजे महाराष्ट्रातील अनेक वर्तमान पत्रातुन नियमितपणे स्तंभ लेखन करतात.

सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, इतिहास, अभिनय, संगीत ,कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्राशी संबंधित असल्याने त्यांना पत्रकारितेच्या क्षेत्रातील दीर्घ काळ अनुभवआहे.सध्या लक्ष्मण राजे महाराष्ट्रातील लोककलेच्या क्षेत्रातील दिग्गजांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन सुप्रसिद्ध लोककलावंत गायक कै.वामनराव कर्डक यांची नात कमल कचर कर्डक यांच्या सहकार्याने एका पुस्तक निर्मितीचे काम करीत आहेत. तसेच आजवर असंख्य बातम्या, रोखठोक आणि परखडपणे विचारमंथन करणारी पत्र आणि लेख असे त्यांनी केलेले लिखाण विविध वर्तमान पत्रातुन प्रसिद्ध झाले आहे.

वृत्तपत्र लेखक म्हणून त्यांनी वर्तमान पत्रातून सातत्याने विविध समस्या मांडून त्या समस्या सोडविण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत.विशेष करून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनच्या काळात अनेक सामाजिक संस्थांचे गोरं गरिबांना अन्नदान, मास्क सॅनिटायझर मदत वाटप उपक्रमांच्या बातम्या सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून विविध वर्तमान पत्रातुन प्रसिद्ध केल्या आहेत.तसेच अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी सहकार्य केले आहे. कोरोना संकटात लक्ष्मण राजे यांनी सोशल मीडियावरून जनजागृती केली आहे.त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी कोरोना योध्दा सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे. त्याअनुषंगाने अभिजित राणे युथ फाऊंडेशन मुंबई या संस्थेच्या वतीने पत्रकारितेतील बहुमोल योगदानाबद्दल त्यांना राज्यस्तरीय विशेष पुरस्कार जाहीर केला आहे. यापुर्वी ज्येष्ठ नागरिक विरंगुळा संस्था भाईंदर पूर्वे या संस्थेच्या वतीने मिरा भाईंदरच्या माजी महापौर मा.डिंपल मेहता यांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या संस्थेच्या वतीने कै.अनंत पारूडेंकर स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.तसेच त्यांना अनेक संस्थांच्या माध्यमातून पुरस्कार, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण राजे यांना अभिजीत राणे फाऊंडेशनचा पुरस्कार जाहीर झाल्याने राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना मनःपुर्वक हार्दिक अभिनंदनीय शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच त्यांना पत्रकारितेतील पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.