वाशिम जिल्ह्यातील अभ्यासिका चालू कराव्यात

37

🔸जगदंब ग्रुप महाराष्ट्र राज्य तर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी)मो:-8308862587

वाशिम(दि.22सप्टेंबर):-नुकत्याच जाहीर झालेल्या 12,500 जागांच्या पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांना अभ्यासाची दुरावस्था होत असून तेथे मुलांची लिमिट ठेवुन व सोशल डिस्टन्ससिंग चे काटेकोरपणे पालन करून अभ्यासिका चालू करण्यात याव्यात अशी मागणी जगदंबा युवा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शुभम भाऊ मुसळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांना केली.

यावेळेस जगदंबा युवा ग्रुप महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल मोहनकर, प्रदेश सचिव वैभव जुनघरे, विशाल कालापाड, मालेगाव तालुका प्रमुख बाळू शिंदे, तसेच शाखाप्रमुख अक्षय बोरकर, सचिन राठोड, हनुमान पुरी, गणेश मोहनकर, दिपेश पाखरे, नागेश अखाडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.