कायदे नकोत, सरळसरळ स्वामिनाथन आयोग लागू करा, भिक नको हक्क हवे – क्षत्रिय साम्राज्य सेना अकोला

    78

    ✒️अकोला(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    अकोला(दि.25सप्टेंबर):- सत्ताधारी भाजप सरकारने केंद्रामध्ये शेती आणि शेतकरी यांना उध्वस्त करणारे विधायक संसदेत मंजूर करून शेतकऱ्यंना वर अंन्याय केला आहे. त्यामुळे पुढील काळात शेतकऱ्यांची भांडवलदार कडून मोठ्या प्रमाणत लूट होत आहे. या विधयकावर रणकंदन सुरू आहे. कुठल्याही चर्चे शिवाय ही विधायक गोंधळात मंजूर करण्यात आला. त्यामुळे केंद्र सरकार सगळी कडून टीका होत आहे..

    सादर विधायक माध्यमातून आपण शेतकऱ्यासाठी काही नवीन करत असल्याची केंद्र सरकारची भूमिका आहे.. परंतु निर्बंध काढून टाकल्याने एक प्रकारे मक्तेदारी निर्माण होणार आहे. परंतु त्यामुळे तीनही विधेयक केंद्रसरकार ने संख्याबळावर रेटून धरून मंजूर करून घेतली. एकी कडे कांदा निर्यातीवर बंदी घातली शेतक~यांना भाव मिळू द्यायचा नाही. एम एस पी काढून टाकायची दुसरी कडे शेतकरी उध्वस्त करणारे विधायक,खरं तर हमीभाव आणि स्वामिनाथन आयोग लागू करण्याचा निर्णय असे मत क्षत्रिय साम्राज्य सेना अकोला जिल्हाध्यक्ष सागर गावंडे यांनी व्यक्त केले आहे.