पुरोगामी पञकार संघाच्या महाराष्ट्र राज्य विधी कायदेशीर सल्लागार कमिटीच्या ” महाराष्ट्र राज्य अध्यक्ष”पदी माजी न्यायमूर्ती बी. जी.कोळसे पाटील

    44

    ✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

    बिड(दि.28सप्टेंबर):-संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारांचा लढा देणारे, छञपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज , राष्ट्रमाता जिजाऊ, , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , माता रमाई आंबेडकर यांनी आयुष्यभर सामाजिक शैक्षणिक राजकीय मानवतेसाठी हक्काकरीता लढा दिलेल्या विचारावर राज्यात व देशातील पुरोगामी विचारांचा लढा देणारे माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील आहेत.त्यांनी शेतकरी,शेतमजूर ,कामगार, वंचित, शोषितांच्या हक्कासाठी लढा देवून न्याय मिळवून दिला. पुरोगामी पत्रकार संघातंर्गत महाराष्ट्र राज्य विधी कायदेशीर सल्लागार कमिटी’च्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांची विजय सूर्यवंशी यांच्या आदेशावरून आज घोषणा करण्यात आली.

    पुरोगामी पञकार संंघाचे संस्थापक अध्यक्षश्री विजय सूर्यवंशी,सचिव श्री प्रविण परमार, सल्लागार राज्य श्री सुभाष , खजिनदार श्री राजाराम माने,सल्लागार बालासाहेब अडागळे,महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी, अध्यक्ष श्री विनोद पवार,उपाध्यक्ष श्री प्रकाश चितळकर,उपाध्यक्ष प्रा. दशरथ रोडे, सचिव श्री सुभाष परदेशी, उपसचिव श्री कैलाश गर्दे,खजिनदार श्री सुनिल चौधरी,संघटक श्री शरद मराठे,संघटक श्री संतोष परदेशी,संघटक श्री छोटूलाल मोरे, संघटक भागवत वैद्य, संघटक श्री सागर ननावरे,प्रवक्ता श्री कृष्णा बेडसे,निमंत्रक श्री प्रवीण जोशी,उपाध्यक्ष श्री गणेश जाधव,प्रसिद्धी प्रमुख सौ. प्रतिमा चौहान, निमंत्रक श्री प्रल्हाद पाटील.अॕड. योगेश बोबडे प्रदेशाध्यक्ष, राज्य विधी कायदेशीर सल्लागार कमिटी , अॕड , संध्या राजपूत राज्य विधी कायदेशीर सल्लागार, अॕड . शेख साजिद अब्दुल वाहेद, बीड जिल्हा-अध्यक्ष-विधी-सल्लागार, पुरोगामी पत्रकार संघाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी निवडीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.