ब्रम्हपुरी तालुक्यात विजांचा प्रचंड कहर – पुन्हा एक विजेचा बळी

26

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.29 सप्टेंबर):-(मंगळवार) तालुक्यातील महिनाभरात दुसरी एक घटना वीज पडून एक शेतकरी जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी. मृतक शेतकऱ्याचे नाव अरविंद तिजारे (45) रा. तलोधी (खुर्द) येथील रहिवाशी आहे.तर जखमी युवक शेतकऱ्याचे नाव नंदू बडगे (35) असे असून, गोगाव येथील रहिवाशी आहे.आज सायंकाळी मृतक व जखमी युवक दोघेही शेतात काम करीत असताना अचानक पाऊसाचा वातावरण निर्माण होऊन , विजांचा कडकडाट सुरु झाला, आणि अचानक जवळपास सहा वाजता, काळाचा घात मृतक अरविंद तिजारे व नंदू बडगे यांवर पडला.

यात अरविंद तिजारे या शेतकऱ्याचा वीज पडून जागीच मृत्यू झाला तर नंदू बडगे हे गंभीर जखमी झाले. मृतक व जखमी युवक दोघेही एकमेकांचे नातलग असून,मृतक हा जखमी युवक चा भाऊजी लागत होता. मृताकाच्या मागे दोन मुले , व पत्नी होती, मृतक हा घरचा कर्ता असून मृत्तकाच्या घरावर दुःखाचे डोंगर कोसळला असून,मृताकच्या जाण्याने तलोधी (खुर्द) व गोगाव येथे शोककळा पसरलेली आहे.

——————जाहिरात—————–