कांग्रेस कार्यकर्त्यांनी केले महात्मा गांधीजी पुतळ्यास अभिवादन

  38

  ✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

  हिंगणघाट(दि.2ऑक्टोबर):-राष्ट्रपिता महात्मा गांधी याचे जयंतीनिमित्त आज स्थानिक जयस्तंभ चोकात गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.

  राष्ट्रपित्याने अहिंसेच्या मार्गाने देशाला इंग्रजांच्या तावडितून मुक्त करीत बंधुभाव,समतेची शिकवण देत आपल्या प्राणाची आहुती दिली असून सद्या केंद्रातिल सरकार मात्र या थोर नेत्यांच्या शिकवणीची पायमल्ली करीत आहे.

  जनतेने वेळीच सावध होऊन या सरकारला धड़ा देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन यावेळी शहरातील कांग्रेस नेते तसेच माजी नगरपरिषद अध्यक्ष पंढरीनाथ कापसे यांनी केले.

  कार्यक्रमप्रसंगी काँग्रेसचे ज्वलंत मून,सुनील हरबूड़े,गुणवंत कारवटकर,पत्रकार इक़बाल पहेलवान तसेच अनेक कार्यकर्त्यांनी नव्या कृषी विधेयकाचा निषेध करीत शेतकऱ्यांची लुबाडणुक होणार असल्याची माहिती दिली..