हे दुःख माझ्या शेतकऱ्यांच्याच नशिबी कशामुळे – मा.अतुल भुसारी

33

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.12ऑक्टोबर):-बुलढाणा जिल्हासह राज्यातील इतर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस पडला होता, शेतात सुगी असल्याचे शेतकरी सांगत होते, मात्र परतीच्या पावसाने सगळ्या सुगीची नासधूस करणे सुरू केले आहे. काल रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने वेचणीला आलेला उभा कापूस भिजवत आहे.

शेतकऱ्यांचे हे नुकसान भरून निघणारे नाही, राज्यातील विद्यमान सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष तर करतच आहे आता त्यात निसर्गानेही भर टाकली आहे, हे दुःख सातत्याने शेतकऱ्यांच्याच नशिबी का येत आहे? यापूर्वी पडलेल्या पावसातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण होण्याअगोदर या 24 तासात बुलढाणा जिल्ह्यसह संपुर्ण महाराष्ट्रात प्रचंड पाऊस पडलेला आहे अन पडतही आहे.

शेतकऱ्यांना आधाराची गरज असून राज्य शासनाने तात्काळ लक्ष द्यायला हवे. मा.अतुलभाऊ भुसारी पाटील राष्ट्रीय अध्यक्ष लोकशासन एकता पार्टी.