ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत शिवभोजन, फळे व मास्कचे वाटप

39

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

जालना(दि.14ऑक्टोबर):-अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगनरावजी भुजबळ साहेब व नाशिक लोकसभेचे मा. खासदार समीरभाऊ भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जालना येथे गोरगरीबनां , गरजूंना शिवभोजन थाळी,फळे व मास्कचे वाटप करण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जालना जिल्हाध्यक्ष श्री. नवनाथआबा वाघमारे, युवक जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे, जिल्हाउपाध्यक्ष सुंदररावजी कुदळे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर खरात, तालुका सोशल मीडिया प्रमुख भागवत खांडेभराड, श्रीकांत भुंबे,जफर मिर्झा, वैजीनाथ राउत यांच्यासह अनेक कार्यकर्ते व गोरगरीब गरजवंत उपस्थित होते.