आदिवासी विकास(असो) संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे खावटी योजनेट होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दिले निवेदन

30

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716528

दोंडाईचा(दि.14ऑक्टोबर):-धुळे जिल्ह्यातील आदिवासी अनुसूचित जमाती टोकरे कोळी, ढोर कोळी, डोंगर कोळी किंवा महादेव कोळी, कोळी मल्हार ,भिल ,पारधी, ठाकूर, अशा ४७ आदिवासी जमातींच्या कुटुंबियांना खावटी योजना २०२०- २१ वर्षासाठी सुरू करण्यात आले आहे. खावटी अनुदान योजनेअंतर्गत प्रति कुटुंब ४००० रु. मिळणार आहेत. परंतु काही जमातींच्या द्वेष भावाने सर्वे करण्यात आला नाही. जसे धुळे नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात ढोर कोळी, टोकरे कोळी,मल्हार कोळी, डोंगर कोळी किंवा महादेव कोळी, या आदिवासी कोळी जमातींच्या उप जमातींच्या सर्वे केला नाही.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार ४७ जमाती आदिवासी साठी पात्र असताना मोजक्या जमातीच्या सर्वे करण्यात आला आदिवासी विभागकडून आदिवासींवर अन्याय होत आहे. सुटलेले जे आदिवासी आहेत. त्यांच्या पुना सर्वे करण्यासाठी स्थानिक शिक्षकांना व ग्रामसेवकांना आदेश पारित करावेत. असं केल्यास एकही आदिवासी कुटुंब योजनेपासून वंचित राहणार नाही.

पुन्हा सर्वे न झाल्यास आदिवासी विकास संघ आंदोलन करण्यात रस्त्यावर उतरेल असा इशारा आदिवासी विकास संघटना संस्थापक मा. मोतीलाल सर सोनवणेयांनी दिला आहे तरी तात्काळ सर्वे करण्याच्या सूचना देण्यात याव्यात.
यावेळेस निवेदन देण्यास उपस्थित मान्यवर आंदोलन प्रमुख महाराष्ट्र राज्य श्री नामदेव (आप्पा) येळवे, आदिवासी विकास संघ धुळे जिल्हा अध्यक्ष श्री संजय दावळे, संदीप तवर, टोकरे कोळी युवा मंच मनोज कोळी, दीपक सोनवणे, महेंद्र निकम, श्री बापू कोळी, योगेश निकम, योगेश थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.