फादर स्टॅन स्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ सत्याग्रह आंदोलन

36

🔸रिजनल ख्रिश्चन सोसायटी व रिपब्लिकन युवा मोर्चा कडून आयोजन

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

पुणे(दि.15ऑक्टोबर):-भीमा कोरेगाव – एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेले झारखंड येथील फादर स्टॅन स्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ समस्त ख्रिस्ती बांधव पुणे शहर , रिजनल ख्रिश्चन सोसायटी व रिपब्लिकन युवा मोर्चा यांचे वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

नक्षलवादाच्या आरोपातून ख्रिस्ती धर्मगुरूची अटक अत्यंत निषेधार्ह असून केंद्र सरकार याद्वारे ख्रिस्त विरोधी हिंदुत्वाचा अजेंडा राष्ट्रीय तपास यंत्रणा यांच्या मार्फत राबवत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला. फादर स्टॅन स्वामी हे समाजामध्ये व इतर मानवी समाजसेवा करणाऱ्या समूहामध्ये अत्यंत आदरणीय व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. कोरोना कालावधीमध्ये 83 व्या वर्षी त्यांची अटक होणे ही केवळ ख्रिस्ती मिशनऱ्यांना बदनाम करण्याची सरकारची योजना असल्याने ती त्यांनी थांबवायला हवी. तसेच स्टॅन स्वामी यांची तात्काळ मुक्तता करावी अशी मागणीही आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे.

या आंदोलनात रिजनल क्रिशन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत केदारी, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अंजुम इनामदार, कष्टकरी पंचायतीचे नेते बाबा कांबळे यांच्यासह सह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. आजच्या आंदोलनामध्ये ख्रिस्ती समाजाच्या पुणे धर्म प्रांतातील अनेक धर्मगुरू यांनीदेखील सहभाग दर्शवला होता. या सर्वांच्या वतीने फादर माल्कम सिक्वेरा यांनी आपली भावना व्यक्त करताना ” फादर स्टॅन स्वामी यांची अटक ही अत्यंत वेदनादायी स्वरूपाची असून त्यांचा तुरुंगामध्ये देखील छळ केला जात असल्याने त्यांची मुक्तता आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आम्ही सर्व लोक अत्यंत शांतताप्रिय व देशाच्या लोकशाही व्यवस्थेवर विश्वास ठेवणारे असून फादर स्टॅन स्वामी यांची मुक्तता होण्यासाठी आमचे आज आंदोलन आम्ही करीत आहोत.” असे सांगितले.

दरम्यान ” फादर स्टॅन स्वामी यांच्या मुक्ततेसाठी न्यायालय तसेच संसदीय मार्गाने निदर्शने व धरणे आंदोलनाचा राज्यव्यापी व्यापक लढा लढण्याची तयारी आम्ही करत असल्याचे प्रतिपादन ” रिजनल क्रिशन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत केदारी यांनी केले आहे.

आजच्या आंदोलनांमध्ये फादर स्टॅनली फर्नांडिस, फादर झेवियर, सिस्टर अर्सेला, सिस्टर मेरी, सिस्टर स्टेला, ॲड. अंतोन कदम, हेंद्री सल्डाणा, जॅकलीन फॉरेस्टर स्नेहल कांबळे, अमोल डंबाळे, निलेश गायकवाड, सलोमी तोरणे, वैशाली पारखे, प्रिया कदम, प्रतीमा केदारी, सुधाकर सदाफळ, प्रवीण मॅथ्यु, संदेश बोर्डे, जॉर्ज अल्हाट, राफायल शेळके, आदी मान्यवर सहभागी झाले होते.सदर आंदोलनाचे निवेदन शिष्टमंडळात द्वारे पुणे जिल्हाधिकारी श्री राजेंद्र देशमुख साहेब यांना देण्यात आले आहे.