कु.साक्षी शिनगारे चे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

30

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.16ऑक्टोबर):-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मन्नाथनगर गंगाखेड या शाळेची विध्यार्थीनी कु.साक्षी विनोद शिनगारे हिने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा २०२० मध्ये उज्ज्वल यश संपादन करून ती शिष्यवृत्ती धारक पात्र झालेली आहे.

तिचा दिनांक १५आक्टोंबर रोजी शाळेच्या वतीने कु.साक्षीचा पालका समवेत सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.बी.आर.देशपांडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.महादेव फड,वर्ग शिक्षक श्री.डी.एल.भोसले,शिक्षीका श्रीमती के.डी.मुंढे मँडम हे उपस्थित होते.