पुरोगामी पत्रकार संघाच्या विधी कायदेशीर सल्लागार अध्यक्ष पदी अँड नागरगोजे तर सचिव पदी अँड.हंडीबाग यांची नियुक्ती

28

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

केज(दि.16ऑक्टोबर):- केज पुरोगामी पत्रकार संघाची बैठक शासकीय विश्रामगृह येथे पार पाडली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाउपाध्यक्ष सूर्यकांत उदारे होते तर म्हणून पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा.दशरथ रोडे,राज्यसंघटक भागवत वैद्य,मराठवाडा सचिव म्हणून स.का.पाटेकर तर विशेष उपस्थिती मध्ये ऍड.सपाटे व शिवाजी दादा ठोंबरे होते.

केज तालुक्यात पुरोगामी पत्रकार संघाची शाखा स्थापन होऊन पदाधिकारी निवडी झाल्या आहेत. निःपक्षपाती व निर्भीड पत्रकार संघ ही या संघाची एक आगळी वेगळी ओळख निर्माण झाली आहे.राज्यभरात संघ पदाधिकारी बरोबर इतर क्षेत्रांतील लोकांना संधी देणारा पुरोगामी पत्रकार संघ हा एकमेव पत्रकार संघ आहे.लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार.या संघासाठी विधी व कायदेशीर सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

विधी व कायदेशीर सल्लागार अध्यक्ष पदी ऍड.ए.एन.नागरगोजे तर सचिव पदी सी.एस.हंडीबाग यांची निवड करण्यात आली आहे.यावेळी संघ वाढीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे मत राज्यसंघटक भागवत वैद्य यांनी मांडले तर पत्रकारांनी निःपक्षपाती पणे व निर्भीडपणे पत्रकारिता करून सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत राज्यउपाध्यक्ष प्रा.दशरथ रोडे यांनी मांडले.

यावेळीं राजकुमार धीवर यांनी मत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित घाडगे यांनी तर प्रास्ताविक डी. एम.मुजमुले यांनी केले तर आभार नवनाथ पौळ यांनी केले.यावेळी अमोल सावंत,विशाल धिरे,अनिल जोगदंड उपस्थित होते.