कापसाला 12000/प्रती क्विंटल भाव देऊन खरेदी केंद्र सुरू करा

36

🔸लोकशासन एकता पार्टी नेते मा अतुल भाऊ भुसारी पाटील

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.19ऑक्टोबर):-देशात व राज्यांत सध्या कोरोना सारख्या रोगांची महामारी असल्याने या महामारीचा सर्वच क्षेत्रातील गोष्टींवर परिणाम दिसून येत आहे परंतु या महामारीत सर्वात जास्त नुकसान हे शेतकरायाचे झाले आहे हे तुम्ही आम्हाला मान्य करावे लागते.

सविस्तर व्रत..असे की गेल्या चार वर्षांपासून शेतकरी वेगवेगळ्या संकटांना सामोरे जात आहे.सर्वकाही दुसऱ्याच्या हातात असलेल्या हा व्यवसाय आहे आपल्या जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकरी जास्त आहे परंतु या वर्षी वेगवेगळ्या संकटांना तोंड देत कापूस या पिकाच उत्पादन शेतकर्यांनी घेतला आहे परंतु आज शासनाने हमी भावाने त्याची विक्री होते नाही कारण अजुन शासकीय कापूस खरेदी केंद्र चालु झाले नाही याचा फायदा व्यापारी लोक घेत आहे.

करण / रु प्रती क्विंटल भावात ते कापूस घेत आहेत.त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना या काळात आधार देण्याचे काम करावे व तात्काळ.12000/प्रती क्विंटल भावाने खरेदी करून कापूस केंद्र चालु करावे अशी मागणी लोकशासन एकता पार्टी नेते मा अतुल भाऊ भुसारी पाटील यांनी केली आहे.