रावण दहन केल्यास भिम आर्मी तो कार्यक्रम उधळून लावणार

32

🔺जिल्हा अध्यक्ष सुरेश वाघमारे यांचा इशारा

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.22ऑक्टोबर):-रामायण मध्ये ज्या पद्धतीने रावण यांच्या बद्दल विद्रुपीकरण करून हिंदू धर्मात जो रावण राज्या बद्दल कथित अफवा पसरविल्या गेल्या म्हणून लोकांनी अनिष्ट चाली रीतीने रावण दहन करण्याचे वर्षानुवर्षे जी कुप्रथा चालविली आहे .तो इतिहास अत्यन्त खोडसाळ व चुकीच्या पद्धतीने लिहून लोकांचे मन रावण राजा बद्दल कलुशित केले मात्र रावणाचे चारित्र्य पवित्र व आचरण शील होते तेंव्हाच सीतामाईला सहीसलामत ठेऊन तिच्या शिला चे पालन केले मात्र आज ही रावणाचे चित्र वाईट आहे.

असे समाजातील काही कथित पंडित रंगून सांगत असून त्यामुळे रावण राजा ला बदनाम करण्याचे षडयंत्र पूर्वीपासून चालू असून या विचारला मूढमती देण्याचे काम समाजातील काही सत्य शोधक संघटना करित असून या देशात राम आणि रावण युद्ध संपवून .या देशात समता बंधुत्वता नांदावी व हा देश संविधानावर चालावा म्हणून भिम आर्मी भारत एकता मिशन संपूर्ण देशात कार्यरत असून यापुढे कुठे ही रावण दहन झाल्यास ते आम्ही कदापिही खपवून घेणार नाही.

असे भिम आर्मी उत्तर मुंबई जिल्हा प्रमुख सुरेश वाघमारे यांनी .प्रशासनाला सूचक इशारा दिला असून उत्तर मुंबईत जर कोरोनाच्या धर्तीवर रावण दहन केल्यास तो कार्यक्रम भिम आर्मी उधळून लावेल याबाबत सुरेश वाघमारे यांनी मालवणी पोलीस ठाणेत संपर्क करून याबद्दल माहिती घेतली व त्याना सांगितले कि जर तुम्ही रावण दहन ला परवानगी दिली तर आम्ही तो कार्यक्रम उधळून लावू तेंव्हा पोलिसांकडून सध्या कोरोनामुळे कुणालाच परवानगी नसून सर्व कार्यक्रम बंद आहेत .अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

मात्र समाजात काही समाजद्रोही लोक असतात ते कायद्याला न जुमानता रावण दहन करू शकतात अश्याना भिम आर्मी कडून सूचक इशारा देतो कि या पुढे जर तुम्हाला पुतळे जाळायचे असेल तर बलात्कारी आसाराम बापू .चिन्मयानंद निर्भया हत्याकांड .हात रस हत्याकांड .खैरलांजी हत्याकांड इशरत अश्या हत्याकांडातील आरोपींचे पुतळे भर चौकात जाळा जेणेकरून करून पुन्हा समाजात कुणी बलात्कारी पैदा होणार नाही.

व येथील महिलांना आत्म सन्मानाने जगता येईल आम्ही संविधान रक्षक भाई चंद्रशेखर आजाद भिम आर्मी संस्थापक व विनय रतन सिह राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशाने व नेहाताई शिंदे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख आणि दीपक हनवते यांच्या मार्गदर्शना खाली रावण दहन रोखण्याचा कार्यक्रम रोखण्याचा उधळून लावण्याचा पवित्रा घेणार असून जिल्ह्यात रावण दहन होऊ देणारच नाही असा सूचक इशारा प्रसिद्धी माध्यमा द्वारे सरकार व प्रशासना ला सुरेश वाघमारे यांनी दिला आहे.