ह.भ.प श्री.शुभांगजी महाराज (शास्री) घोटेकर नाशिक जिल्हा युवासमिती कार्याध्यक्ष पदी नियुक्ती

33

🔹जिल्हा अध्यक्ष अण्णा साहेब आहेर यांनी जाहीर केली निवङ

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.24ऑक्टोबर):-वारकरी महामंड॓ळ जिल्हा युवा समिती नाशिक चे जिल्हा कार्याध्यक्ष पदी प्रसिध्द नव तरुण किर्तनकार हभप शुभांगजी महाराज शास्री घोटेकर,खेडलेझुंगे वय (२२) वर्ष यांची जिल्हाध्यक्ष हभपश्री आण्णासाहेब महाराज आहेर हिसवळकर यांनी नुकतीच नियुक्ती केली आहे. हभप शुभांग महाराज हे जिल्ह्यातील प्रसिध्द अभ्यासु किर्तनकार व महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय हभपश्री माधवजी महाराज शास्री घोटेकर खेडलेझुंगे यांचे चिरंजीव आहेत.

घोटेकर शास्री यांचे घराण्यात परंपरागत परमार्थाचा हा तिसरे पिढीचा अभ्यासु वारसा आहेत. वै.हभप. भागवत महाराज शास्री घोटेकर यांना ही संत सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हभपश्री माधवजी महाराज शास्री घोटेकर यांना ही श्री.जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभपश्री संदिपान महाराज शिंदे हासेगांवकर यांचे हस्ते निफाड येथे दिड वर्षापुर्वी आदर्श वारकरी किर्तनकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. हभपश्री.माधवजी महाराज शास्री यांनी श्री.जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा अभ्यासक्रमानंतर ही सलग २४वर्ष अध्यात्म तत्व ज्ञानाचा गाढा अभ्यास करुन महाराष्ट्र भर ज्ञानवंत रसिक श्रोतुवर्गाची मने जिंकली आहेत.

त्यांचेच पाऊलावर पाऊल ठेऊन चिरंजीव हभप शुभांग महाराज शास्री हे वयाच्या १८व्या वर्षी पुणे विद्यापीठाकडुन शास्री पदवी मिळाल्याबद्दल गौरविल्या गेले.महाराष्ट्र शासनाचेही पुरस्कार हभप शुभांग यांनी अगदी खेळण्या बागडण्याच्या वयातच प्राप्त करुन तरुण वर्गात एक आदराच व मानाच स्थान प्राप्त करुन आपले परिवारच भवितव्य उज्वल करुन घोटेकर कुळाचे शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांचे मुळे हभपश्री. माधवजी महाराज शास्री यांचाही पुणे विद्यापिठाने मुद्दाम गौरव करुन असा दुर्मिळ योग क्वचितच अनुभवतो कारण तिसरे पिढीपर्यत परंपरा आपले नाशिक जिल्ह्यात हा सुवर्ण योग आहे.कारण नाशिक जिल्ह्यातील सर्वात तरुण संस्कृतचे पदवीधर म्हणुन एकमेव हभप शुभांग महाराज यांचा गौरव करण्यात आला.

हभप शुभांगजी महाराज यांनी आतापर्यत॔ खरोखर आकाशाला गवसनी घातली आहे. त्यांच्या पदव्या (१)एम ए ईंग्लिश द्वितीय वर्ष (२)एम.ए.हिन्दी प्रथम वर्ष (३)संस्कृत बी.ए.(४)पखवाज अलंकार प्रथम (५)तबला विशारद (उपांत्य विशारद ) कमी वयात असा हा सर्व अभ्यास करुन पुढे भविष्यात पी.एच.डी. करण्याचा मानस त्यांनी नुकताच बोलुन दाखवला. थोडक्यात सर्व नवतरुणांनी आदर्श घ्यावा अस जीवन हभपश्री. शुभांग महाराज यांच आहे. आज ही श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथे वारकरी शिक्षण संस्था ते चालवत आहेत.

हभप शुभांग महाराज शास्री घोटेकर यांच्या अभ्यासु शैलीचा नक्कीच फायदा नव तरुण पिढीला होईल ते युवा समिती वारकरी महामंडळ जिल्हा कार्याध्यक्ष पदाला योग्य न्याय देऊन जिल्हाभर तरुणांना भक्तीमार्गाकडुन अभ्यासु वृत्तीचा अंगिकार करण्यास यशस्वी होतील व स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील उद्याचा आदर्श भारत, सुसंस्कारी नव तरुणांची फळी उभी करतील अशी अपेक्षा व्यक्त करुन पुढील कार्यास शुभेच्छा देऊन अभिनंदन करतो.

हभप शुभांग महाराज घोटेकर यांचे महाराष्ट्र वारकरी महामंडळ जिल्हा कार्याध्यक्ष हभपश्री बाळकृष्णजी महाराज शास्री ठोके, जिल्हा उपाध्यक्ष हभपश्री माधवजी महाराज शास्री घोटेकर,कोषाध्यक्ष हभपश्री दत्तात्रय पा. डुकरे, संघटक हभप श्री. तुकाराम महाराज क्षिरसागर,हभपश्री प्रविणजी महाराज तिपायले,हभपश्री राजेंद्र महाराज थोरात,हभपश्री प्रल्हाद महाराज शास्री गवळी, युवा समिती जिल्हाध्यक्ष हभपश्री संदिप महाराज खकाळे,उपाध्यक्ष हभपश्री. राहुल महाराज पाटील,कार्याध्यक्ष हभप शरद महाराज निकम,सचिव हभपश्री पंकज महाराज कराड, हभपश्री.संदिप महाराज रायते,तसेच निफाड तालुकाध्यक्ष हभपश्री हरिश्चंद्र आप्पा भवर,उपाध्यक्ष हभपश्री विश्वनाथ आण्णा वाघ,हभपश्री काशिनाथ शेठ व्यावहारे देवगांव व सर्वच जिल्हा व तालुका कमिटीने त्यांचे स्वागत व हार्दीक अभिनंदन केले आहे.