श्री. साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालयाला कायम सलग्निकरण कमेटीची भेट

31

✒️सचिन महाजन(तालुका प्रतिनिधीहिंगणघा)मो:-9765486350

हिंगणघाट(दि.24ऑक्टोबर):-वडनेर येथील श्री.साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालयाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपुरच्या कायम सलग्निकरण कमेटीने भेट दिली.या कमेटी च्या अध्यक्षा डॉ.रेखा वाडीखाये यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयाची संपूर्ण तपासणी करण्यात आली.

या कमेटीमध्ये डॉ. निहार शेख, डॉ. गणेश मायवाडे , डॉ. सतिश चाफले यांचा सहभाग होता. या समितीच्या सर्व सदस्यांनी महाविद्यालयाचा परिसर व प्रगतीची भरभरून स्तुती केली. महाविद्यालयाने गेल्या वीस वर्षात केलेल्या समाज उपयोगी व शैक्षणिक कार्याची दखल या समितीने घेतली. व महाविद्यालयाची खूप प्रसंशा केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी या हेतूने महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.

व आमचे महाविद्यालय ते कार्य पूर्ण करीत असल्याबाबत चे समाधान महाविद्यालयाचे संस्थापक सचिव प्रा. दिवाकर गमे यांनी शेवटी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उत्तम बी. पारेकर यांनी प्रास्ताविकपर स्वागताध्यक्ष म्हणून भाषण केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. विनोद मुडे यांनी केले.

या प्रसंगी संस्थेचे सहसचिव श्री. अविनाश गमे, डॉ. सारिका गमे , डॉ. नरेश भोयर, डॉ. प्रविण करंजकर, डॉ. विठ्ठल घिनमिणे, प्रा. पंकज मून, प्रा. नितेश तेलाहांडे, कु. प्रीती सायंकर, श्री. अंकुश वैद्य, श्री. अरुण तीमांडे, कू. विजयालक्ष्मी जरोंडे, श्री. कापसे, श्री. संजय पर्बत यांनी महत्वाची भूमिका बजावली.