नायगाव युवक काँग्रेसच्या वतीने “जोगवा मागतो आम्ही रोजगाराचा जोगवा”

    122

    ?”मनाचे दार उघडा मोदी साहेब आता दार उघडा”

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नांदेड(दि.24ऑक्टोबर):-देशात कोरोना चा महासंकट त्यात निसर्गाचा लहरीपणा ओला दुष्काळ लॉक डाऊन आधी कारणामुळे संबंध जर माणसाचे जीवन उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

    नवरात्र महोत्सवाच्या पावन पर्वामध्ये दुर्गामाता आई अंबाबाई यांच्यापुढे युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही जोगवा मागत आहोत जोगवा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा,जोगवा बेरोजगारी दूर करण्याचा, जोगवा उद्योगधंदे वाढीसाठी प्रोत्साहन देण्याचा जोगवा माता बहिणीच्या संरक्षणाचा जोगवा अशा विविध मागण्या घेऊन युवक कॉंग्रेस आज घरोघर जाऊन विद्यमान केंद्र सरकारला सद्बुद्धी देण्याचा माता अंबाबाई यांच्याकडे जोगवा मागण्यात आला आहे.

    माणिक माधवराव पाटील चव्हाण यांच्या पुढाकारातून यावेळी उपस्थित विठ्ठल बेळगे सुरज पाटील शिंदे तालुकाध्यक्ष एनएसयुआय नवनाथ पाटील जाधव राजू कांबळे श्रीहरी पाटील सोमठाणकर जयराज पाटील पांढरे सुनील शेळगाव शिवाजी पाटील चव्हाण अभिजीत मंगरुळे राहुल शेळके यशवंत मांजरमकर व नायगाव युवक काँग्रेस व मा आमदार वसंतराव चव्हाण साहेब मित्र मंडळ उपस्थित होते.