कारखानदारांचे आणखी दहा दिवस नाक दाबून ठेवा – प्रकाश आंबेडकर यांचे ऊसतोड कामगारांना आवाहण

84

🔸ऊसतोड कामगारांच्या मागण्यांसाठी अॅड बाळासाहेब आंबेडकरांनी घेतला कोयता हातात

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

बीड-केज(दि.26ऑक्टोबर):- दि-२५ रोजी बीड जिल्ह्यातील भगवान गडाच्या पायथ्याशी ऊसतोड कामगारांच्या मागण्यांसाठी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.ऊसतोड कामगारांना आता कुणीही नेता राहीला नाही अशी भावना ऊसतोड कामगारांमध्ये गोपीनाथ मुंडे गेल्या पासुन होती.परंतू आज भगवान गडाच्या पायथ्याशी जमलेल्या ऊसतोड कामगारांना वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकरांच्या रुपाने नेता मिळाल्याची भावना प्रबळपणे जाणवतं होती.

ऊसतोड कामगारांनीआणखी दहा दिवस कारखानदारांचे नाक दाबून धरा म्हणजेच तोंड उघडेल,असा विचार देतं ऊसतोड कामगारांचा संप अजुनही दहा दिवस चालेल याचे संकेत बाळासाहेब आंबेडकर यांनी दिले आहेत.साखर कारखान्यांनी मशिन्स चर्या सहाय्याने उसकापण्याचे ठरवले तर शंभर टक्के उसकापणी शक्य नाही, मशिन्स ही सहा इंचावरून ऊस कापते व त्या सहा इंचाच्या खालच्या पेरात जास्त साखर असते त्यामुळे मशिन्स च्या दराइतका दर ऊसतोड कामगारांना मिळू शकतो त्यासाठी आणखी काही काळ तग धरण्याची गरज आहे असेही यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी म्हटले.

ऊसतोड कामगारांचा करार संपला आहे मात्र कारखानदार अद्यापही नवा करार करुन वाढीव दर जाहीर करीत नाहीत म्हणून ऊसतोड कामगारांचा संप सुरू आहे.या लढ्याला यशस्वी करण्यासाठी जे योगदान देता येईल ते द्या.करारनामा झाल्याशिवाय एकही कामगार गाडीत बसणार नाही, याची काळजी घ्या. ऊसतोड कामगार मुकादमांच्या वाहतुकदार यांच्या भाववाढीसाठी लढा हा खर्या अर्थाने शेतकरी व शेतमजुरांच्या न्यायहक्काचा लढा आहे असंही यावेळी बोलताना बाळासाहेब आंबेडकर यांनी बोलताना नमुद केले.

कारखाना सुरू करणे ही कारखानदारांची गरज आहे. ऊसतोड मजूरांनी नव्या करारनाम्यासाठी माथाडी कामगारां सारखा लढा द्यावा. माथाडी कामगारांसारखा ऊसतोड कामगार बोर्ड तयार झाला पाहिजे,व ती जिम्मेदारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पार पाडायला हवी अशी भूमिका ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.

ऊसतोड कामगार मुकादमांच्या वाहतुकदार यांच्या भाववाढीसाठी व माथाडी बोर्डाच्या धर्तीवर ऊसतोड कामगार बोर्ड तयार व्हावा यासाठी ऊसतोड कामगार,वाहतुकदार, आणि मुकादमाच्या एकुण सात संघटनेच्या वतीने वंचित बहूजन आघाडीचे प्रणेते अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संप पुकारलेला आहे.आता लढाई निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली आहे.ऊसतोड कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी भगवान गडाच्या पायथ्याशी आज बाळासाहेब आंबेडकरांनी हातात कोयता घेतला आहे असे आवाहण मेळाव्यास उपस्थित असलेल्या मान्यवरांनी यावेळी जमलेल्या जणसमुदयास केले.

यावेळी मेळाव्यास प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, उपाध्यक्ष माजी पोलीस आयुक्त अॅड.धनराज वंजारी, सीटू प्रणित महाराष्ट्र ऊसतोड कामगार मुकादम, वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष डॉ.डी.एल कराड, ऊसतोड कामगार मुकादम, वाहतूक संघटना प्रदेशाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर, वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ डोंगरे,ऊसतोड कामगार संघटना बीड जिल्हाध्यक्ष राणबा उजगरे, राज्य प्रवक्ते अमितभाऊ भूईंगळ, राज्यमहासचिव भीमराव आबा दळे, वंचित बहुजन आघाडी राज्यनिमंत्रक अॅड.अरुण आबा जाधव, राज्यमहाचिव अनिल अण्णा जाधव, राज्याचे युवा नेते सागरभाऊ भिंगारदिवे, मराठवाडा प्रदेश अध्यक्ष अशोकजी हिंगे, राज्यनेते प्रा.विष्णू जाधव, लातूर-नांदेड जिल्हा निरिक्षक मिलिंद भाऊ रोकडे, तमाम नवयुवक कार्यकर्त्यांचे जेष्ठ मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडी चे जेष्ठ नेते अॅड.सतिष काळम पाटील,भगवंत आप्पा वायबसे,बीड जिल्हा उपाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे, मिलिंद भाऊ घाडगे,प्रसेनजित रोडे,सुशांत धावारे,सचिनजी मेघडंबर, नामदेव सानप जेष्ठ नेते डॉ.नंदकिशोर सोमवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती तर जिल्हाभरातील तसेच राज्यातील विविध भागातून हजारो ऊसतोड कामगार मुकादम उपस्थित होते.