मराठी साहित्य मंडळाच्या सांगली जिल्हाध्यक्षा पदी सामाजिक कार्यकर्त्यां सौ.अर्चना विनायक पांचाळ – सुतार यांची निवड

37

✒️शिवानंद पांचाळ(नायगाव,शहर प्रतिनिधी)मो:-9960748682

नायगांव(दि.30आॅक्टोबर):-अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेने देशभरातील राज्यांच्या प्रदेश अध्यक्षांची यादी नुकतीच घोषित केली होती,त्यामुळे साहित्य वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती महाराष्ट्र राज्यातील जिल्हा अध्यक्षांची यादी जाहीर केली आहे.

ही यादी जाहीर करताना पुरेपूर दक्षता घेतल्याचे दिसून येत आहे, साहित्य मंडळाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा जेष्ठ कवयित्रीं ललिता गवांदे यांच्या उपस्थितीत सरचिटणीस कवयित्रीं सोनम ठाकूर यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ जयप्रकाश घुमटकर यांच्या आदेशानुसार नुकतीच एका पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे.

यामध्ये सांगली जिल्हाध्यक्षा पदी सामाजिक कार्यकर्त्या सौ,अर्चना विनायक पांचाळ -सुतार यांची नियुक्ती घोषित केली आहे,सौ,अर्चना पांचाळ- सुतार यांनी गेली कित्येक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात समाज उपयोगी मदत कार्यात सहभाग नोंदवून समाज उपयोगी विविध उपक्रमात नेहमी पुढाकार घेऊन मोलाचे कार्य करत असतात, सौ, अर्चना सुतार यांच्या निवडीमुळे साहित्य /सामाजिक क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे,व सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.