हिंगणघाट येथे आमदार समीर कुणावार यांचे हस्ते समाज भावनांचे लोकार्पण

57

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(31ऑक्टोबर) -आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या विशेष निधी अंतर्गत भीमनगर वार्ड प्रभाग क्रमांक १ मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाज भवन व विठ्ठलमंदिर वार्ड प्रभाग क्रमांक २ हिंगणघाट येथे समाज भवनाचे लोकार्पण
दिनांक 31-10-2020 ला मा. कार्यसम्राट आ. समीरभाऊ कुणावार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

भीमनगर वार्ड प्रभाग क्रमांक १ व विठ्ठलमंदिर वार्ड प्रभाग क्रमांक २ हिंगणघाट येथील नीवासी यांची समाज भवनाची मागणी अनेक वर्षापासून होती या समाज भवनाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे छोटेमोठे कार्यक्रम या समाज भवनामध्ये व्हावे तसेच गावातील तरुण युवक-युवती त्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण शिबिर तसेच व्यक्तिमत्व विकास शिबीर यासारखे कार्यक्रम या समाज भवनामध्ये होण्याच्या दृष्टिकोनातून एक हक्काची जागा व्हावी हे भीमनगर वार्ड प्रभाग क्रमांक १ व विठ्ठलमंदिर वार्ड प्रभाग क्रमांक २ हिंगणघाट येथील निवासी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम मा. कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार यांनी हे नागरिकांचे स्वप्न पूर्ण केले.

या भवनांमुळे भीमनगर वार्ड प्रभाग क्रमांक १ व विठ्ठल मंदिर वार्ड प्रभाग क्रमांक २ या वार्ड ला विकासात्मक दृष्टी लाभल्यामुळे आज अनेक वर्षापासून असणारी ही मागणी पूर्ण झाल्याने या गोष्टीचा सर्व वार्डातील निवासी यांनी आनंद व्यक्त केला. समाज भवन हे कुठल्याही एका समाजासाठी तयार केलेली वस्तू नसून समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांकरिता तयार झालेली ही वास्तू आहे.

!!अनेकता मे एकता यही हमारी विशेषता !!
ही विशेषता जोपासण्याचे काम सुद्धा या समाज भवनाच्या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे.
सदर या लोकार्पण सोहळ्यामध्ये हिंगणघाट नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रेम बाबू बसंताणी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीनभाऊ मडावी, नगर परिषदेचे उपाध्यक्ष चंदूभाऊ घुसे, बांधकाम सभापती सौ. शितलताई खंदार, नगरसेवक श्री राजू कामडी, बांधकाम विभागाचे श्री. पोफळे साहेब, चंदूभाऊ माळवे, श्री. अमोलभाऊ खंदार* तसेच इतर मान्यवर असंख्य कार्यकर्ते व गावकरी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते.