फौजदारी न्यायालयात बार असोसिएशन तर्फे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा सत्कार

30

🔹डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक भेट

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.31ऑक्टोबर):- दिवाणी व फौजदारी न्यायालयात कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्री.गजानन कोलते यांच्या सेवानिवृत्त दिनाचे औचित्य साधून ब्रह्मपुरी तालुका बार असोसिएशचे जेष्ठ अँडव्होकेट श्री.मनोहरराव उरकुडे साहेब यांनी सत्कारमुर्ती श्री.गजानन कोलते यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक भेट स्वरूपात देऊन सत्कार केला.

यावेळी बार असोसिएशनचे जेष्ठ अँडव्होकेट.श्री.दिलीप माटे,अँडव्होकेट.धिरज अलगदेवे, अँडव्होकेट.सुधीर तलमले, अँडव्होकेट.नरेश नंदागवळी, अँडव्होकेट.आशिष गोंडाने प्रामुख्याने हजर होते.