गंगाखेडचे भुमि पुत्र समाजसेवक आशोक जंगले यांचे निधन

    32

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

    गंगाखेड(दि.3नोव्हेंबर):-अतिशय धक्कादायक आणि विश्वास न बसणारी, मनाला वेदना देणारी घटना अशोक नारायण जंगले रा. गंगाखेड यांच्यावर अचानक काळाने घाला घातला. स्वताची जबाबदारी सांभाळत असतानाच हृदय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला आहे.अतिशय गरिबीतून संघर्ष करीत अशोक जंगले यांनी मुंबई गाठली.

    लहानपणापासून सामाजिक कार्यात सक्रिय असणारा दिशा केंद्राच्या माध्यमातून कर्जत या शहरात स्थिरावला होता. कर्जत ताल्युक्यातील सर्वसामान्य, गरीब-गरजू, कष्टकरी, अधिवाशी, विधवा, परितक्त्या महिलाच्या न्याय हक्कासाठी लढणारा एक योद्धा म्हणून त्याची ओळख निर्माण झाली होती. दि. २ नोव्हेंबर रोजी कर्जत या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात कोव्हीड सेंटर च्या उद्घाटन सोहळ्यात ते उपस्थित होते . उद्घाटन प्रसंगीच त्यांना अचानक छातीत दुखत होते.

    त्यातच त्यांना हृदय विकाराचा झटका आला व त्यात त्यांचे दु:खद निधन झाले. मत्याचे सोबतचे जिवाभावाचे सहकारी मित्रांनी त्यांना तात्काळ अतिदक्षता विभागात दाखल केले,पण प्रकृती चिंताजनक होत असल्याने त्यांना नेरुळ च्या DY पाटील रुग्णालयात दाखल केले पण याच ठिकाणी अशोक जंगले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एक आशावादी, धाडसी, काहीतरी करण्याची जिद्द असणारा, लढणारा-लढविणारा, एक संघर्षमय योद्धा निघून गेला.

    अशोक जंगले यांच्या जाण्याने दलित, आदिवासी व कष्टकऱ्यांची मोठी हानी झाली आहे. निर्माण झालेली पोकळी कदापी भरली जाणार नाही. त्यांच्या पच्छात आई,पत्नी दोन मुली एक मुलगा, भाऊ भावजई, असा परीवार आहे. यांच्या अचानक गेल्याने कर्जत सह गंगाखेड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पार्थिवावर दि. ३ नोव्हेंबर रोजी गंगाखेड येथे गोदावरी स्मशान भुमित अंत्यसंस्कार केला जानार आहे.