भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या प्रणय कापगते यांचा सत्कार

38

🔸इन्स्पायर करिअर अकॅडमीचा नाविन्यपूर्ण अभीनव उपक्रम

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रह्मपुरी(दि.4नोव्हेंबर):-चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका ब्रह्मपुरी व सभोवतालच्या परिसरातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन व अभ्यासीका मिळावी व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेचे महत्त्व कळावे या उदात्य हेतुने ब्रम्हपूरी येथे मा. प्रा लक्ष्मण मेश्राम सर यांनी पुढाकार घेऊन इन्स्पायर करिअर अकॅडमी ची स्थापणा केली.

व या अकॅडमी मधुन अनेक विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहुन यशाची यशस्वी वाटचाल आपल्या अभ्यासाने पुर्ण करुन दाखवली आहे. यामधे इन्स्पायर करिअर अकॅडमी मधील गुरूजन वर्गाचा मौलीक वाटा आहे. याचाच एक भाग म्हणजे सामान्य कुटुंबातील प्रणय कापगते याची भारतीय सैन्यदलात निवड होणे होय.

भारतीय सैन्य दलात निवड होणे म्हणजेच देशाची सेवा करण्याची सुवर्णसंधी चालून येणे होय. अशी संधी इन्स्पायर करिअर अकॅडमी चा विद्यार्थी प्रणय कापगते या विद्यार्थ्याला मिळाली. प्रणय ची निवड सैन्यदलात झाल्यामुळे त्याचा सत्कार इन्स्पायर करिअर ॲकॅडमी तर्फे करण्यात आला या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी इन्स्पायर करिअर अकॅडमी चे मार्गद.र्शक मा. आंबोरकर सर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी राहुल जाधव सर तसेच अकॅडमीचे मार्गदर्शक प्रा. प्रकाश इंगळे सर, सेमस्कर सर तसेच इन्स्पायर ॲकॅडमी चे संचालक प्रा. लक्ष्मण मेश्राम सर आदी मान्यवर सत्कार सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते.

सदर सोहळ्याप्रसंगी उपस्थित मार्गदर्शकांनी प्रणय चे कौतुक करून इतरांनीही त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी व स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करावं अशी इच्छा व्यक्त केली. त्याचप्रमाणे प्रणय ला पुढील जीवनासाठी शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या. आपल्या मार्गदर्शनात प्रकाश इंगळे सर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व पटवून देत स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे आंबोरकर सर यांनी सुद्धा स्पर्धा परीक्षेचे जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. लक्ष्मण मेश्राम सर यांनी केले. संचालन स्नेहल बेदरे तर आभार प्रदर्शन शालू उपरीकर हिने केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौरव ठोंबरे श्रेयस, विपाली येडेवार, ज्योती राऊत, उज्वला निंबकर, पल्लवी खेत्रे, दीपाली चाचेरे, शुभम गुरुनुले, मंगेश ढोरे, महेश कोलते इत्यादींनी सहकार्य केले.