पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणार : संतोष निकम

30

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.6नोव्हेंबर):- पत्रकारांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असून पत्रकारांचे प्रश्न कुणीही गांभीर्याने घेत नसल्याची खंत व्यक्त करत पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी (राष्ट्रीय) विश्वगामी पत्रकार संघ लढा देणार असल्याचे प्रतिपादन पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी केले.

(राष्ट्रीय) विश्वगामी पञकार संघाची दुसरी जिल्हास्तरीय बैठक हतगड तालुका सुरगाणा येथे पार पडली यावेळी निकम बोलत होते. अध्यक्षस्थानी सुरगाणा तालुका अध्यक्ष भागवत गायकवाड हे होते.

प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश अध्यक्ष इंजि. वैभव पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डॉ राजेश साळुंके,सचिव इंजि. रमेश देसाई, सुभाष परदेशी, प्रदेश महिला अध्यक्षा सौ. सुजाता गुरव, प्रदेश महिला सचिव हेमलता परदेशी, प्रदेश महिला संघटक सुलभाताई पवार, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजे श्रीमंत गिरीशजी घोरपडे, पुणे शहर निमंत्रक नंदकुमार बोळे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष वाजीद शेख, उत्तर महाराष्ट्र सल्लागार प्रा. ललित खैरनार,उतर महाराष्ट्र संघटक शातांरामभाऊ दुनबळे, महिला जिल्हा अध्यक्ष डॉ अर्चना आहेर, गुंजाळ, जिल्हा उपाध्यक्ष इम्रान शहा, जिल्हा कार्याध्यक्ष विजय केदारे, कळवण तालुका उपाध्यक्ष रुपेश बाळासाहेब वराडे आदी उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यापुढे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वतीने प्रत्येक तालुका व जिल्ह्यात गड किल्ले संवर्धनाचे काम केले जाणार असल्याचे संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष व संताजी, धनाजी घोरपडे यांचे वंशज राजे श्रीमंत गिरीश घोरपडे यांनी सांगितले. महिला सक्षमीकरणासाठी पत्रकार संघ प्रयत्न करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुजाता गुरव यांनी सांगितले.

कार्यक्रमात सुरगाणा तालुका पत्रकार संघ राष्ट्रीय विश्वगामीी पत्रकार संघात विलीनीकरण करण्यात आला तालुक्यातील पत्रकारांचा प्रवेश सोहळा संपन्न झाला नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्त पत्र व ओळखपत्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले. पत्रकारांच्या न्याय हक्का बरोबरच भारत सरकार व राज्य शासनाच्या अंतर्गत राबविल्या जाणार्‍या विविध योजनांची माहिती सामान्य माणसाला मिळावी यासाठी संघाच्या वतीने प्रयत्न केला जाणार आहे.

राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघ संचालित बहुउद्देशीय संघ स्थापन करण्यात आले आहे. त्यात राष्ट्रीय विश्‍वगामी कामगार संघ, व्यापारी संघ, ग्राहक हक्क संरक्षण संघ, ह्यूमन राईट मानव हक्क संरक्षण संघ, महिला संघ, शेतकरी संघ, प्रवासी संघ, जेष्ठ नागरिक संघ, समाजकार्य संघ, कलावंत संघ, श्रमिक संघ, शेतमजूर संघ, उद्योजक संघ, लघु उद्योजक संघ, शिक्षक संघ (ITI, प्राथमिक,अंगणवाडी, बालवाडी माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक संघ असे विभाग करण्यात आले असून लवकरच त्यांचे कामकाज सुरू करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरगाणा तालुका कार्यकारणी अशोक भोये -उपअध्यक्ष, नवनाथ पवार उप अध्यक्ष, नामदेव पाडवी कार्याध्यक्ष, सतीश गाढवे सर, सरचिटनिस, जुनेद पठाण – संघटक, दौलत चौधरी, सहसरचिटनि, गणेश धुळे -सहसंघटक, सुनील धूम___ संघटक, रविंद्र गावित – सदस्य, रामभाऊ थोरात- सदस्य, विजय थविल- सदस्य, सिताराम पवार- सदस्य, दिपक कानडे_ – सदस्य, यशवंत देशमुख_- सदस्य, धनराज देशमुख सदस्य, वाजीद शेख उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष, नितीन चौधरी -नाशिक जिल्हा सचिव तुकाराम अलबाड सल्लागार आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.