समाजहितासाठी सर्व गटतट बाजुला सारुन सर्व भीमसैनिकांनी एकत्र येणे काळाची गरज

38

🔸माजी मंत्री चंद्रकातजी हंडोरे यांचे प्रतिपादन

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.9नोव्हेंबर):- भीम शक्ति सामाजिक संघटना पुसद च्या वतीने स्थानीय शासकिय विश्रामग्रुह येथे भीम शक्ति संघटनेच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधीत करतांना महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री तथा भीम शक्ति संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. चंद्रकातजी हंडोरे साहेब म्हणाले की समाज हितासाठी सर्व गटतट बाजुला सारुन सर्व भिम सैनीकांनी एकत्र यावे कारण कोणत्याही पक्षाचे शासन असो आंबेडकरी कार्यकर्ताचा आवाज दाबण्याचे काम सर्वच राजकीय पक्षात सुरू आहे. धर्म निरपेक्ष म्हवुन घेणारा काँग्रेस पक्ष हा यात मागे राहीलेला नाही.

माझ्या कार्यकाळात मी सुरु केलेल्या सर्व शासकिय योजना मागास्वार्गीयाच्या उथानासाठी अमंलात आणल्या होत्या. त्या आज सर्व डभगाहीस गेल्या आहे. त्यामुळे राज्यातील मागासस्वार्गीय समाज आपल्या मुलभुत आधिकारापासून वंचित राहीला आहे.याला सर्वसवी जवाबदार राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार ठरले आहे. म्हणूनच समाजावर होनारा अन्याय पाहुन मनात असंतोष निर्माण झाला आहे. म्हणूनच आज ख-या अर्थाने त्यांना जागे करण्यासाठी भीम शक्तिची ताकत अख्या महाराष्ट्रात दाखवण्याची गरच आहे. अश्या वेळप्रसंगी कांग्रेस पक्षाचा त्याग करण्याची वेळ आली तरी चालेल असा रोखटोक ईशारा देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाई उध्दोजक विठ्ठलराव खडसे सर हे होते .तर प्रमुख पाहुणे म्हणुन नाशिकचे माजी महापोर अशोकजी दिवे, दिनकर ओंकार, दिलीप भोजराज, अविनाश भगत, एन, के, कांबळे उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी भीम शक्ति संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरज भाऊ हाडसे, संतोष अंभोरे, देवेंद्र खडसे पंचायत समिति सदस्य, संजय पाईकराव, माधव हाटे,देवा जगताप, सुखदेव गायकवाड़, वैभव खंदारे, अंबादास वानखेड़े, भीमराव उंदरे सर, नारायण ठोके ,सुरज कुरील नेता मोची समाज, सुनिल पाटील सर, मोहम्मद आजिम, शरद ढेंबरे, भय्या मन्वार, निलेश मनेश्वर ईत्यादी असंख्य भीम शक्ति संघटनेचे पदाधिकारी तथा कार्यकर्त उपस्थित होते. यावेळी सुत्रसंचालन प्रा. जनार्दन गजभीये यांनी केले तर आभार प्रदर्शन ओमप्रकाश गवई यांनी केले.