महामंडळा मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचे राजकारण थांबवा.! अन्यथा आंदोलन करू – प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य सुनील ठोसर

48

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114/9404223100

गेवराई(दि.11नोव्हेंबर):-अनेक सरकारने अण्णासाहेब पाटील महामंडळ तसेच सर्व महामंडळ सर्वच स्तरातून पात्र लाभार्थ्यांना अतिशय दुःख वाट्याला कायम राहिलेले असून दुर्लक्ष करुन धुळ खात ठेवले होते. कित्येक लोकांना माहितीही नव्हते आपल्या समाजासाठी पण एक महामंडळ आहे. अनेक वर्षापुर्वी विविध सरकारने महामंडळला निधी देऊन आपले कार्यकर्ते जोपासण्याचे काम करत असून स्व.आ.अण्णासाहेबांनी १९८३, साली मराठा आरक्षण प्रश्नी आत्मबलिदान दिले.

सह विविध समाजातील अनेक योद्धे आहे अश्या सर्व योध्यांना महाराष्ट्र राज्य रयत शेतकरी संघटनेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस सुनील नानासाहेब ठोसर पाटील मित्र परिवार विनम्रअभिवादन करतो….. आजही महाराष्ट्र राज्यातील अनेक ठिकाणी विविध योजनांची विविध महामंडळ मार्फत राबवण्यात येत नाहीत अश्या अनेक ठिकाणी जाऊन पात्र लाभार्थी वंचित राहणार नाहीत आजपर्यंत हजारो सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष सुरू झाला.

तो आजही मोठ्या प्रमाणावर गोरगरीब जनतेला दिलासा एक आधारवड होतोय हेच ध्येय कायम स्मरणात राहतील हजारो तरुणांना महामंडळ मार्फत योजनाचा लाभ मिळवून घेण्यासाठी आजही काय यातना सहन कराव्या लागतात अनेक युवकांना आत्महत्या केल्याचे सबंध राज्यातील जनतेला माहीतच आहे. सरकार कुणाचही असलं तरी कामगार व समाजाच्या हितासाठी, प्रश्नासाठी आक्रमकता घेऊन न्याय मिळवून देणे गरजेचे असते.

पण फक्त सत्ता संघर्षाच्या जुगलबंदी खेळात सामील झालेले नेते आपापल्या आमदार मंत्री माजी आमदार माजी मंत्री व बडे गुत्तेदार, कार्यकर्ते सांभाळून ठेवण्यास गुंतलेले असतात नुकतंच एकच काय आघाडी सरकारने व सर्व मंत्री मंडळ यांनी सर्वच मंडळ बरखास्त करून राज्यातील ६५% शेतकऱ्याच्या आकडेवारी पाहता ६५% मंडळावर मुलाला संधी मिळाली पाहिजे अशी मागणी.महाराष्ट्र राज्य रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील नानासाहेब ठोसर पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे. नुकतेच दौरे काढून जनतेला दिवाळी गोड करू मनात शासनाच्या व प्रशासनाच्या कॅलेंडर दिवाळी तारीख चुकल्यासारखं वाटत आहे.

राज्यातील हजारों जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी खरे लाभार्थंपर्यंत योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आजपर्यंत मंडळ या नावाखाली प्रकरणे वाटप केले त्या आधी लुटले किती याचा हिशोब मागण्याची वेळ आली आहे ?. सर्वच प्रलंबित प्रकरणे सोबत घेऊन.मा. अँड.रविप्रकाश देशमुख ऊर्फ बापुसाहेब. संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य रयत शेतकरी संघटना यांचे मार्गद्शनाखाली.मा तय्यब सय्यद पटेल विहामांडवेकर, जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद जिल्हा रयत शेतकरी संघटना.यांच्या नियोजनात राज्यातील सर्वच लोकप्रतिनिधी यांचे घरावर ठिय्या मांडण्यात येईल असे.महाराष्ट्र राज्य रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर पाटील यांनी सांगितले.